PM Kisan Samman Nidhi : मोठी कारवाई ! राज्याने वसूल केले बनावट शेतकऱ्यांकडून तब्बल 26 कोटी रुपये

Published on -

PM Kisan Samman Nidhi : दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 12 वा हप्ता जमा केला आहे. परंतु, अनेकजणांना या योजनेचा लाभ घेता आलं नाही. कारण त्यांनी ई – केवायसी केली नव्हती.

परंतु, आता याबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. उत्तर प्रदेशच्या सरकारने बनावट शेतकऱ्यांकडून एकूण 26 कोटी रुपये वसूल केले आहेत. हा आकडा ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल.

पंतप्रधान किसान सन्मान निधीचा बरेच बनावट शेतकरी लाभ घेत होते. याची माहिती सरकारला मिळाली होती. सरकार भुलेख सर्वेक्षण करत असून बनावट शेतकऱ्यांची माहिती समोर आली आहे.

26 कोटी वसूल

बनावट शेतकऱ्यांची सरकारने चौकशी सुरू केली असून पडताळणीनंतर 2,10,87,849 चा डेटा बरोबर असल्याचे समोर आले आहे. तर उरलेल्या 7,10,747 शेतकऱ्यांना अपात्र ठरवले आहे.

या बनावट शेतकऱ्यांकडून तब्बल 25-26 कोटी रुपये जमा झाले आहेत.त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सर्वेक्षणाचे काम अजूनही सुरू आहे. त्यामुळे आणखी अपात्र शेतकऱ्यांची नवे समोर येऊ शकतात.

पती-पत्नी घेत होते लाभ

तपासात असे आढळून आले आहे की अनेक पती-पत्नी एकत्र या योजनेचा लाभ घेत होते. धक्कादायक म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला आहे. आयकर रिटर्न भरणाऱ्यानी या पैशांचा अपहार केला आहे. ज्यात काही शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला आहे. त्याच्या खात्यात पैसे पोहोचत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News