MPSC Success Story : चर्चा तर झालीच पाहिजे ! दुर्गम भागातील तरुणाने एमपीएसीत मिळवलं यश ; झाला STI

MPSC Success Story : अलीकडे तरुणाई स्पर्धा परीक्षाचा मोठ्या प्रमाणात अभ्यास करत असल्याचे चित्र आहे. तरुण वर्ग ग्रॅज्युएशन नंतर एमपीएससी या स्पर्धा परीक्षेचा सर्वाधिक अभ्यास करतो.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

खरं पाहता, विद्यार्थ्यांच अधिकारी बनण्याचं स्वप्न असत मात्र ही परीक्षा खूपच कठीण असल्याने तसेच खूपच कमी पदे याच्या अंतर्गत येत असल्याने लाखों विद्यार्थ्यांमध्ये फक्त काही शेकडो विद्यार्थीच या परीक्षेत उत्तीर्ण होत असतात किंवा प्रत्यक्षात अधिकारी बनत असतात. एमपीएससी ही प्रतिष्ठेची स्पर्धा परीक्षा म्हणून ओळखली जाते.

या परीक्षेत बहुतांशी विद्यार्थी तर असे असतात ज्यांना वर्षानुवर्ष अभ्यास करून देखील यामध्ये संपादन करता येत नाही. अशा परिस्थितीत या परीक्षेचा क्रेझ अजूनच वाढतो. शिवाय एमपीएससीत यश संपादन केल्यानंतर सदर विद्यार्थी अधिकारी बनतो म्हटल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची त्याच्या गावापासून ते टेलिव्हिजन पर्यंत सर्वत्र चर्चा असते.

Advertisement

यामुळे ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान आता एमपीएससी अंतर्गत येणाऱ्या ग्रुप बी मधील एसटीआय पदाचा अंतिम निकाल समोर आला असून यामध्ये एका दुर्गम भागातील तरुणाने यश संपादित केले आहे. साहजिकच या तरुणाने लेखणीमधील धमक अधोरेखित केली आहे.

तळागाळातील समाजाला जर उद्धार करायचा असेल तर त्याला हातात कलम घ्याव लागेल. स्वतः उठून लढावं लागेल. तळागाळातील मागास आणि दुर्गम भागातील समाजाने लेखणी हातात घेतली जिद्दीने आणि मेहनतीने अभ्यास केला, शिक्षण घेतले तर निश्चितच हा मागास असलेला दुर्गम भागातील समाज इतिहास घडवण्याची ताकद ठेवणारा आहे.

हीच गोष्ट पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील तळपेवाडी येथील एका तरुणाने सत्यात उतरवली आहे. सागर तळपे नामक या तरुणाने एमपीएससी अंतर्गत येणाऱ्या ग्रुप ब मधील एसटीआय म्हणजेच विक्रीकर निरीक्षक या पदाला गवसणी घातली आहे. यामुळे सध्या या तरुणाची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे.

Advertisement

निश्चितच दुर्गम भागातील या तरुणाने आपल्या मेहनतीच्या जोरावर एमपीएससीत मिळवलेलं हे यश इतरांसाठी प्रेरक ठरणार आहे. सागर यांनी पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्ण झाल आहे. आता सागर एसटीआय झाला आहे. यासाठी सागरने गेली अनेक वर्ष मेहनत घेतली आहे.

मात्र सागरने पाहिलेल स्वप्न आता पूर्ण झाल असल्याने त्याला व त्याच्या परिवाराला तसेच त्याच्या गावाला मोठा अभिमान वाटतं आहे. सागर ने एसटीआय पदाला गवसणी घातल्यानंतर त्याच्या गावात जंगी मिरवणूक देखील काढण्यात आली आहे.

Advertisement