Mahindra Cars : अर्रर्र ‘त्या’ प्रकरणात Scorpio-N आणि XUV700 मालकांना धक्का! कंपनीकडे परत न्यावी लागणार कार ; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Ahmednagarlive24 office
Published:

Mahindra Cars :  तुम्ही देखील मागच्या काही दिवसात महिंद्राची दमदार कार Mahindra Scorpio-N किंवा Mahindra XUV700 SUV खरेदी केली असले तर तुमच्यासाठी ही खास बातमी आहे. समोर आलेल्या माहितीनुसार महिंद्राने एक मोठा निर्णय घेत आपल्या लोकप्रिय कार्स Mahindra Scorpio-N आणि  Mahindra XUV700 SUV रिकॉल केले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार महिंद्राने वेंडर क्वालिटी कंट्रोलच्या कारणास्तव या दमदार SUV रिकॉल केले आहे.  ज्यामुळे क्लच बेल हाऊसिंगमध्ये सापडलेल्या रबर बेलोच्या ‘ऑपरेशनल डायमेंशनल क्लिअरन्स’वर परिणाम होऊ शकतो.

रिकॉलचा उद्देश रबर बेलोची तपासणी करणे आणि बदलणे हा आहे. अशी माहिती समोर आली आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो महिंद्राने रिकॉल केलेल्या मॉडेल्समध्ये Scorpio-N च्या 6,618 युनिट्स आणि XUV700 च्या 12,566 युनिट्सचा समावेश आहे. ही सर्व मॉडेल्स मॅन्युअल ट्रान्समिशन युनिट्स आहेत. या कार्स तपासण्यासाठी ग्राहकांना डीलरशिपवरून बोलावले जाईल. यानंतर ग्राहकांना त्यांची कार एसयूव्ही डीलरशिपवर न्यावी लागेल. येथे काही दोष आढळल्यास, आवश्यक भाग बदलले जातील. विशेष म्हणजे यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

या तारखेचे मॉडेल रिकॉल

महिंद्राच्या अधिकृत विधानाचा अहवालात उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये, कंपनीने म्हटले आहे की स्कॉर्पिओ-एन मॅन्युअल ट्रान्समिशन कार्सची 6618 युनिट्स आणि XUV700 मॅन्युअल ट्रान्समिशन कार्सची 12,566 युनिट्स रिकॉल केली आहे.

यामध्ये 1 जुलै ते 11 नोव्हेंबर 2022 दरम्यान उत्पादित केलेल्या मॉडेल्सचा समावेश आहे. महिंद्रा ही मर्यादित तपासणी आणि त्यानंतरच्या दुरुस्तीमध्ये सक्रियपणे गुंतलेली आहे. डीलरशिपद्वारे ग्राहकांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधला जाईल.

MAHINDRA XUV700 will give relief to customers Know the price

या कार्सना 2 वर्षांचा वेटिंग पिरियड आहे

Mahindra Scorpio-N जून 2022 मध्ये लॉन्च करण्यात आली होती, तर Mahindra XUV700 या वर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च करण्यात आली होती. दोन्ही एसयूव्ही 2.2-लिटर mHawk टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनसह येतात. इंजिनला 6 स्पीड मॅन्युअल आणि टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय मिळतात.  Scorpio-N साठी बुकिंग सध्या बंद आहे आणि विशिष्ट व्हेरियंटवर अवलंबून 2 वर्षांपर्यंत वेटिंग पिरियड आहे, तर Mahindra XUV ला 1 वर्षापर्यंतवेटिंग पिरियड आहे.

हे पण वाचा :- Post Office KVP:  ग्राहकांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ भन्नाट योजनेत एक महिन्यापूर्वीच पैसे होणार डबल ; जाणून घ्या कसं

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe