Soybean Price Maharashtra : शेतकऱ्यांना सुखद धक्का ! सोयाबीन दरात झाली वाढ, ‘या’ बाजार समितीत मिळाला साडे सहा हजाराचा भाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Price Maharashtra : महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आज सुखद धक्का मिळाला आहे. आज बाजारभावात वाढ झाली आहे. लातूर एपीएमसीमध्ये आज सोयाबीनला सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.

यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. याव्यतिरिक्त आज वाशीम एपीएमसी मध्ये सोयाबीनला सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे.

निश्चितच आज सोयाबीन 6000 पार गेल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव असून आगामी काळात दरवाढीची आशा जागृत झाली आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावाची माहिती जाणून घेणार आहोत.

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 491 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4400 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 54001 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे तसेच सरासरी बाजारभाव 5300 नमूद झाला आहे.

संगमनेर एपीएमसी :- या बाजारात आज 13 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज या एपीएमसी मध्ये किमान दर 5349, कमाल दर 5400 अन सरासरी दर पाच हजार 374 नमूद झाला.

श्रीरामपूर एपीएमसी :- आज या एपीएमसी मध्ये 31 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज या बाजारात किमान दर 4900 , कमाल दर पाच हजार तीनशे अन सरासरी दर पाच हजार नमूद झाला.

परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजारात आज सातशे क्विंटलं आवक झाली. या ठिकाणी किमान दर 5000, कमाल दर 5407 आणि सरासरी दर 5251 नमूद झाला.

मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 402 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5200 प्रतिक्विंटल एवढा किमान दर, 5300 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर तसेच सरासरी दर पाच हजार 250 नमूद झाला.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 8163 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5150 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर, 5328 एवढा कमाल दर तसेच 5239 एवढा सरासरी दर मिळाला.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 599 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लीलाबाद या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4500 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून पाच हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5250 नमूद झाला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1655 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5100 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5611 प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5355 रुपये नमूद झाला आहे.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 343 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 46001 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर ; 5,457 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर तसेच सरासरी दर पाच हजार 330 नमूद झाला.

राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 53 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आता झालेल्या निलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4501 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5415 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5200 नमूद झाला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 17760 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5200 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून सहा हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर पाच हजार सातशे रुपये नमूद झाला आहे. 

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 7126 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावाद या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4250 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5350 नमूद झाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 3157 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5300 नमूद झाला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1557 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5400 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5200 नमूद झाला आहे.

वासिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 6000 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4750 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5500 नमूद झाला आहे.