Aditya Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाची नक्कल केली. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका देखील केली. त्यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राज ठाकरे हे सतत शिवसेनेवर टीका करत असतात. मात्र उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाची नक्कल केल्याने ठाकरे गटाचे नेते चांगलेच नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

आदित्य ठाकरे म्हणाले, त्यांनी काहीही बोलले तरी मी त्यावर फार बोलणार नाही. माझे संस्कार तसे नाहीत. त्यांनी तर एकेकाळी आजोबांचे जेवणही काढले होते. असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी खंत व्यक्त केली आहे.
राज ठाकरे यांनी गोरेगावातील एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांची नक्कल केली होती. तब्येतीचे कारण सांगून ते घरात बसत होते. एकनाथ शिंदे यांनी रात्रीतून कांडी फिरवली तेव्हा कळले. तेव्हा ते घरात बसत होते, पण आता सगळीकडे फिरताय असे म्हणत निशाणा साधला होता.
राज ठाकरे म्हणाले, आरोग्याचे कारण सांगून जी व्यक्ती लोकांना भेटत नव्हती. मुख्यमंत्री पदावरून गेल्यावर हे सगळे व्यवस्थित झाले. ज्यावेळेला लोक सांगायचे, आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायचंय, पण ते भेटत नव्हते. हा विषय आरोग्य किंवा प्रकृतीचा नाही. तर त्यामध्ये मला काय म्हणायचंय हे समजून घ्या असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.