Electric Bike : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्व ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे जास्त आहे, सर्वत्र सध्या इलेक्ट्रिक वाहनांना जास्त पसंती मिळत आहे. EVची मागणी देशात सध्या वेगाने वाढताना दिसत आहे, विशेषत: दुचाकी विभागात. अशातच बाईक कंपन्या देखील इलेक्ट्रिक वाहनांनमध्ये जास्त रस दाखवत आहेत, आणि मार्केटमध्ये आपल्या नवनवीन इलेक्ट्रिक बाईक आणत आहेत.
अशातच लोकप्रिय कंपनी रॉयल एनफिल्ड देखील इलेक्ट्रिक मार्केटमध्ये प्रवेश करत आहे. ग्राहक बऱ्याच काळापासून रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बाईकची वाट पाहत आहेत, जरी रॉयल एनफिल्डच्या इलेक्ट्रिक मॉडेलची देखील अनेक वेगवेगळ्या प्रसंगी चर्चा झाली आहे.
दरम्यान, यावेळी ब्रँडचे साहसी टूरर मॉडेल हिमालयन ईव्ही अवतारात येणार असल्याची चर्चा इंटरनेटवर तुफान पसरली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, रॉयल एनफिल्ड प्रमाणे सादर होणारी ही पहिली इलेक्ट्रिक बाईक देखील असू शकते.
ऑटोमोबाईल वेबसाइट बाईक वालेच्या अहवालात रॉयल एनफिल्ड हिमालयाच्या इलेक्ट्रिक मॉडेलचे काही फोटो देखील शेअर करण्यात आले आहेत. या अहवालानुसार, कंपनी हिमालयन इलेक्ट्रिकवर काम करत आहे, तथापि कंपनीकडून याबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. यापूर्वी इंटरनेटवर रॉयल एनफिल्डच्या आणखी एका इलेक्ट्रिक मॉडेलची चर्चा झाली होती, ज्याचे नाव होते ‘Electrik01’.
जर आपण हिमालयन इलेक्ट्रिकबद्दल बोललो तर, लीक झालेल्या इमेजमध्ये बाईकच्या मेकॅनिझम आणि डिझाइनबद्दल काही माहिती देखील दिली आहे, जी सुरुवातीच्या टप्प्यात असल्याचे दिसते. हे फक्त एक स्केच आहे जे डिजिटली रेंडर केले गेले आहे.