Maruti Alto : फक्त 25 हजार रुपयांमध्ये घरी घेऊन जा मारुतीची कार, मायलेजही आहे जबरदस्त

Published on -

Maruti Alto : मारुतीच्या सर्व कार्सना भारतीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. या कारने अल्पावधीतच भारतीयांच्या मनात आणि भारतीय बाजारपेठेत स्थान मिळवले. ग्राहकांच्या मागणीनुसार कंपनी आपल्या कार्समध्ये बदल करत असते.

मारुती अल्टो तुम्ही आता फक्त 25 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. सेकंड हँड वाहनांची विक्री आणि खरेदी करणाऱ्या वेबसाइटवर तुम्हाला ही जबरदस्त संधी मिळत आहे.

या कारमध्ये तुम्हाला जबरदस्त फीचर्स मिळतील. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 3.39 लाख रुपये इतकी आहे. तर टॉप वेरिएंटसाठी 5.03 लाख रुपये मोजावे लागतील. जर तुम्हाला ही कार विकत घ्यायची असेल तर तुम्ही ती स्वस्तात खरेदी करू शकता.

Maruti Suzuki True Value वेबसाइट

मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू वेबसाइटवरून तुम्ही अल्टोचे 2010 चे पेट्रोल इंजिन मॉडेल खरेदी करू शकता. विशेषतः ही कार 65,893 किलोमीटर धावली असून तुम्ही ही कार फक्त 25,000 रुपयांमध्ये घरी नेऊ शकता. त्याशिवाय कंपनी तुम्हाला या कारवर 1 वर्षाची वॉरंटी आणि 3 मोफत सेवाही देत आहे.

OLX वेबसाइट

OLX वेबसाइटवरून तुम्ही अल्टोचे 2009 चे मॉडेल खरेदी करू शकता. ही कार चांगल्या स्थितीत असून यासाठी तुम्हाला 65,000 रुपये मोजावे लागतील हे लक्षात घ्या की या कारवर कोणताही फायनान्स प्लॅन मिळत नाही.

QUIKR

QUIKR वेबसाइटवरून तुम्ही मारुती अल्टोचे 2011 मॉडेल घरी नेऊ शकता. ही कारदेखील चांगल्या स्थितीत असून तुम्हाला या कारसाठी 85,000 रुपये मोजावे लागतील. त्याचबरोबर या देखील कारवर कोणताही फायनान्स प्लॅन उपलब्ध नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News