Petrol Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने होत असलेली घसरण आंतरराष्ट्रीय बाजारात वर्चस्व गाजवत आहे. दरम्यान, सरकार दर कमी करण्यासाठी प्रयत्न करत असून याचा फायदा सर्वसामान्यांना मिळणार आहे.
किमती किती कमी होतील?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर, येथे कच्च्या तेलाची किंमत जवळपास $80 च्या पातळीवर आहे. देशांतर्गत बाजारातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी घसरण होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 12 ते 14 रुपयांनी घट होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
अर्थ मंत्रालयाकडून नुकसान भरपाईची मागणी केली जाईल
पेट्रोलियम मंत्रालयाने म्हटले आहे की, यापूर्वी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी झेप होती, त्यावेळी तेल कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते, ज्याची भरपाई आता अर्थ मंत्रालयाकडे मागितली जाणार आहे. जेणेकरून कंपन्यांचा तोटा कमी करता येईल.
तीन कंपन्यांचे किती नुकसान झाले?
अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांना एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान सुमारे 21,201.18 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाणून घ्या
देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे.
मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
कोलकात्यात पेट्रोलचा दर रु.106.03 आणि डिझेलचा दर रु.92.76 प्रति लिटर आहे.