Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला पळो की सळो करून सोडले आहे. शिंदे गटावर संजय राऊत हे सतत टीकास्त्र डागत असतात. संजय राऊत माध्यमांशी बोलताना शिंदे गटावर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.
संजय राऊत यांनी दिवार चित्रपटातील डायलॉग म्हणत शिंदे गटावर टीका केली आहे. दिवार चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या हातवर लिहिले असते, मेरा बाप चोर हैं. तसंच हे गद्दार आहेत अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर केली आहे.
घा यांच्या कपाळावरती गद्दारीचा शिक्का बसलाय. यांच्या पिढ्यानंपिढ्यांना ही गद्दारी आता शांतपणे जगू देणार नाही असा इशाराही संजय राऊत यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत दिला आहे.
संजय राऊत यांच्या टीकेनंतर शिंदे गटातील आमदारांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. संजय गायकवाड यांनीही संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी त्यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी तर शिवीगाळच केल्याचे पाहायला मिळाले.
संजय गायकवाड म्हणाले, आमच्यावर उठावाची क्रांती केल्याचा अभिमान आमच्या पिढीला वाटणार आहे. त्यामुळे संजय राऊत तू यानंतर अशी भाषा वापरू नको.
पडायचे की, लढायचे हे लोकांना माहीत आहे. लोकांना आम्हाला शिवसेना-भाजप म्हणून निवडून दिले होते. चित्रपट चित्रपटाच्या ठिकाणी आहे. तू तुझा पक्ष किती भूईसपाट केला आणि आमच्या किती जागा निवडून येतील, हे वेळचं ठरवेल, असा इशारा संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांना दिला आहे.