Vodafone Idea : आपल्या ग्राहकांना जोडून ठेवण्यासाठी दूरसंचार कंपन्या नेहमीच नवनवीन प्लॅन आणत असतात, अशातच व्होडाफोन आयडियाने नुकताच एक नवीन पोस्टपेड प्लान सादर केला आहे. Vodafone Idea ने ही योजना आपल्या REDX ब्रँडिंग अंतर्गत सादर केली आहे.
कंपनीने याला अनलिमिटेड टॅगलाइनसह सादर केले आहे. या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता उपलब्ध आहे आणि यादरम्यान अमर्यादित कॉलिंग करता येते. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना Vi’s Binge All Night चाही लाभ मिळेल. यासह वापरकर्त्यांना Vi Movies आणि TV Classic मध्ये देखील प्रवेश दिला जाईल.

Vodafone Idea चे सुमारे 3 प्लॅन आहेत. ज्यांची किंमत 2899 रुपये, 2999 रुपये, 3099 रुपये आहे आणि या सर्व प्लॅनची वैधता 365 दिवस आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, हा प्लॅन 2999 रुपयांच्या आहो, ज्यामध्ये यूजर्सच्या सोयीसाठी अनेक घटक समाविष्ट करण्यात आले आहेत. या प्लॅनची माहिती TelecomTalk ने शेअर केली आहे.
Vodafone Idea च्या 2999 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 365 दिवसांची वैधता आणि एक वर्षाच्या वैधतेसह 850GB इंटरनेट मिळते. म्हणजेच, डेटा दैनिक मर्यादेच्या आधारावर विभागला जात नाही.
या पोस्टपेड प्लॅनमध्ये तुम्हाला ३६५ दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळेल. यामध्ये डेली 100 SMS, Binge All Night, We Movie Access, TV Classic ची सुविधा दिली जाईल.
Vodafone-Idea च्या Binge All Night च्या मदतीने, वापरकर्ते रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत अमर्यादित इंटरनेट डेटाचा लाभ घेऊ शकतील. हा डेटा वापरकर्त्यांच्या पॅकेजमधून कापला जाणार नाही.
Vodafone Idea च्या या प्लॅनमध्ये युजर्सना 365 दिवसांची वैधता मिळते आणि सोबतच दररोज 1.5 GB इंटरनेट मिळेल, म्हणजेच संपूर्ण वर्षभरात 547.5 GB इंटरनेट डेटा मिळेल.
Vodafone-Idea च्या या प्लॅनची वैधता एक वर्ष आहे आणि दररोज 2 GB इंटरनेट डेटा मिळेल, जो संपूर्ण वर्षभरात एकूण 730 GB डेटा आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतील.