Pension Plan for Senior Citizen : लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत असते. त्यामुळे या योजनांचा भविष्यात खूप फायदा होतो.
यापैकीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री वय वंदना योजना होय. ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने ही योजना आणली आहे. या योजनेत भविष्यात खूप फायदा होतो. महिन्याला या योजनेतून 18500 रुपये पेन्शन दिली जाते.

31 मार्च 2023 पर्यंत गुंतवणूक करता येईल
सरकारने 26 मे 2020 रोजी ही योजना सुरू केली. तुम्ही आता या योजनेमध्ये 31 मार्च 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकता. ही एक सामाजिक सुरक्षा योजना आणि पेन्शन योजना आहे. ही योजना LIC द्वारे चालवली जाते. या योजनेअंतर्गत गुंतवणुकीची कमाल मर्यादा 15 लाख रुपये निश्चित केली आहे.
असा घ्या लाभ
जर पती-पत्नी दोघांनीही वयाची 60 वर्षे ओलांडली असतील तर त्यांना 15 लाख रुपये गुंतवता येतात. इतर योजनांची तुलना करायची झाली तर या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीवर जास्त व्याज मिळते. या योजनेत 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना मासिक किंवा वार्षिक पेन्शन योजना निवडता येतात.
अशी आहे पेन्शन
जर एखाद्या विवाहित जोडप्याने या योजनेत 15 लाख रुपये गुंतवले तर त्यांची रक्कम सुमारे 30 लाख रुपये होती. या योजनेवर वार्षिक 7,40 टक्के व्याज आहे. याचा अर्थ गुंतवणुकीवर तुमचे वार्षिक व्याज 222000 रुपये असेल. जेव्हा ते 12 महिन्यांत विभागले जाते तेव्हा ते 18500 रुपये होईल. हे तुम्हाला महिन्याला पेन्शन म्हणून मिळेल.
या योजनेत तुम्हाला फक्त 1 व्यक्तीला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर त्या व्यक्तीला 15 लाखांच्या गुंतवणुकीवर 111000 रुपये वार्षिक व्याज मिळते. त्या व्यक्तीला महिन्याला 9250 रुपये पेन्शन मिळेल.
10 वर्षांमध्ये पेमेंट परत केले जाते
हेदेखील लक्षात ठेवा की ही योजना 10 वर्षांसाठी आहे. त्याशिवाय, तुम्ही जमा केलेल्या पैशावर तुम्हाला महिन्याला पेन्शन मिळेल. जर या योजनेत तुम्ही 10 वर्षे गुंतवणूक केली तर 10 वर्षानंतर तुम्हाला तुमचे गुंतवलेले पैसे परत मिळतील. ही योजना तुम्हाला कधीही सोडता येते.