UPSC Interview Questions : जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. कारण आम्ही या बातमीमध्ये काही महत्वाच्या प्रश्नांची यादी घेऊन आलो आहे, त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक जाणून घ्या.
UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न : इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर : फ्रांस
प्रश्न : देवरुख कोल्हापूर महामार्ग कोणत्या घाटातून जातो?
उत्तर : कुंडी घाट
प्रश्न : मांजरा पठार कोणत्या भागात आहे?
उत्तर : मराठवाडा
प्रश्न : फक्त बुलंदशहाने स्थापन केलेले शहर कोणते आहे?
उत्तर : नागपूर
प्रश्न : घरातील बल्बमध्ये कोणत्या धातूची तार असते?
उत्तर : टंगस्टन
प्रश्न : आंतरराष्ट्रीय गणित दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर : २२ डिसेंबर रोजी
प्रश्न : असे काय आहे जे लहान मुलाला तरुण आणि तरुण मुलाला वयस्कर बनवते?
उत्तर : वय













