E-Shram Card : असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा डेटाबेस तयार करण्यासाठी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने एक पोर्टल केले आहे. ई-श्रम पोर्टल असे या पोर्टलचे नाव आहे.
या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर त्या कामगाराला ई-श्रम कार्ड दिले जाते. विशेष म्हणजे कोणत्याही कोपऱ्यात काम करणाऱ्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना या कार्डसाठी अर्ज करता येतो.

आतापर्यंत एकूण 28.50 कोटी लोकांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली असून सर्वाधिक 8.2 कोटी नोंदणी ही उत्तर प्रदेशमध्ये झाली आहे. त्यापाठोपाठ बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि ओडिशा यांचा नंबर लागतो.
जर तुम्हालाही नोंदणी करायची असेल तर तुम्हाला ई-लेबर पोर्टल अंतर्गत नोंदणी करावी लागेल. त्यानंतर काही दिवसांनी कार्ड बनवले जाते. या पोर्टल अंतर्गत देशातील सर्व मजुरांना एका व्यासपीठावर जोडले जात आहे. नोंदणीसाठी, तुमच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत म्हणजेच आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक इ.
देशातील सरकार सामान्य लोकांच्या हितासाठी अनेक योजना राबवत आहे. यापैकी एक योजना म्हणजे ई-श्रम योजना होय. स्वतः पंतप्रधान मोदी यांचे या योजनेवर लक्ष असून अनेकदा त्यांनी या योजनेचे कौतुक केले आहे.
असंघटित क्षेत्रात बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, स्थानिक रोजंदारी काम करणारे मजूर, घर कामगार, भूमिहीन शेतमजूर आणि इतर असंघटित कामगारांचा समावेश होतो.