Success Story : महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचे येत्या 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. म्हणजे समृद्धी महामार्ग 50 टक्के कंप्लिट झाला आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे.
पाहता 2016 17 मध्ये या महामार्गाची संकल्पना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडली. विदर्भासाठी नेहमीच दूरदृष्टी बाळगणाऱ्या फडणवीसांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगितले जाते. म्हणून या महामार्गाच्या निर्मितीसाठी शासनाकडून लवकरात लवकर पावले उचलण्यात आली होती.
मात्र सुरुवातीला या महामार्गाचा अनेक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. शेतकऱ्यांचा विरोध पाहता शासनाने जमिनीच्या मोबदल्यात पाचपटीने वाढ केली. अशा परिस्थितीत महामार्गात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांकडे कोट्यावधी रुपये येतील आणि शेतकरी बांधव या पैशांचा योग्य वापर करणार नाहीत अशी भीती देखील अनेकांनी बोलून दाखवली. त्यामुळे शेतकऱ्यांजवळ आलेला पैसा ही जाईल आणि त्यांची जमीनही जाईल असे सांगितले जात होते. मात्र या सर्व गोष्टींना समृद्धी महामार्गात आपली साडेचार एकर जमीन गेलेला एक युवक अपवाद ठरला आहे.
या युवकाने महामार्गात जेवढी जमीन गेली त्याची दुप्पट जमीन घेतली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्याच्या मौजे चायगाव येथील जितेश देशमुख यांची साडेचार एकर जमीन समृद्धी महामार्गात गेली. याच्या मोबदल्यात त्यांना एक कोटी 43 लाख रुपये मोबदला मिळाला होता. नितेश देशमुख यांच्याकडे एकूण बारा एकर शेत जमीन होती त्यापैकी साडेचार एकर जमीन समृद्धी महामार्गात गेली. आता जमिनीच्या मोबदल्यात कोट्यावधी रुपये जितेश यांना मिळालेत. जितेश यांनी जमीन जाण्यापूर्वीच जमिनीच्या बदलीत जमीन खरेदी करायची असा निर्णय घेतला होता.
या अनुषंगाने त्यांनी आपल्या शेतीला लागून असलेली साडेसात एकर जमीन खरेदी केली. यासाठी 40 लाख रुपये त्यांनी मोजलेत. उर्वरित पैशात शेती उपयोगी साहित्य घेतले. तसेच शेतीमध्ये ठिबक सिंचन प्रणाली बसवण्यात आली. या पैशांमध्ये भावाचे शिक्षण देखील पूर्ण केले असून त्यांचा भाऊ आता शिक्षक म्हणून कार्यरत झाला आहे. खरं पाहता 2013 पर्यंत जितेश यांनी शेतीकडे ढुंकूनही पाहिलेले नव्हते. तोपर्यंत त्यांचे वडील संपूर्ण शेती सांभाळत. मात्र 2013 मध्ये त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. शेवटी कुटुंबाची सर्व धुरा जितेश यांच्या खांद्यावर आली. मग काय तेव्हापासून त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली. शेतीसोबतच दीपक आपल्या ग्रामपंचायतीत ऑपरेटर म्हणून देखील काम पाहतात.
समृद्धी महामार्गात जमीन गेल्यानंतर कोट्यावधी रुपये आले तरीदेखील जितेश शेती करत आहेत. याउलट शेतीचा व्याप आता वाढला आहे कारण की त्यांनी त्या बदल्यात साडेसात एकर नवीन जमीन खरेदी केली आहे. शिवाय कम्प्युटर ऑपरेटरचा आपलं काम देखील आजही ते करत आहेत. सांगायचा हेतू एकच समृद्धी महामार्गात जमिनी गेल्यानंतर अनेक शेतकरी बांधवांनी कोट्यावधी रुपये आल्यामुळे व्यवसायाकडे दुर्लक्ष करत गाडी, बंगला यांसारख्या गोष्टींमध्ये गुंतवणूक केली.
मात्र जितेश यांनी इतरासारखा विचार न करता आपली जेवढी शेतजमीन गेली आहे त्याच्या दुप्पट शेतजमीन या पैशातून खरेदी करायची आणि आपला व्यवसाय अजून भरभराटीला न्यायचा असं ठरवलं आणि प्रत्यक्षात उतरवून दाखवलं. आजी, आई, लहान भाऊ, बायको आणि मुलगा असं जितेश यांचे छोटसं कुटुंब आहे. सद्यस्थितीला त्यांच्याकडे 15 एकर शेत जमीन झाली आहे. यामध्ये त्यांनी संत्र्याची बाग लावली असून खरिपात सोयाबीन आणि रब्बी हंगामात हरभराचे पीक ते घेत आहेत.
निश्चितच एकीकडे समृद्धी महामार्गासारख्या प्रकल्प बाधितांना कोट्यावधी रुपये मिळतात त्यामुळे ते इतर नाश पावणाऱ्या सोयी सुविधांच्या मागे धावतात. मात्र जितेश याला अपवाद ठरला असून जमीन के बदले जमीन असं धोरण अंगीकारत 12 एकराची शेतजमीन 15 एकरावर नेली असून शेतीतून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. जितेश यांच्या मते या महामार्गामुळे जे 50 वर्षात शक्य नव्हतं ते झाल आहे.