7th Pay Commission : महागाई भत्त्यात पुन्हा होणार 4% ची वाढ, ‘या’ लोकांना मिळणार फायदा

Ahmednagarlive24 office
Published:

7th Pay Commission : जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन वर्ष सुरु होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत.

या नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना एक भेट मिळू शकते. केंद्र सरकार त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए पुन्हा 4% नी वाढणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा दर 6 महिन्यांनी आढावा घेण्यात येतो. महागाई भत्ता वर्षातून दोनवेळा वाढवला जातो. एकदा भाडेवाढ जानेवारीत तर दुसऱ्यांदा जुलैमध्ये होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी म्हणजे 2023 मध्येही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे.

महागाईचे आकडे पाहता पुढील वर्षीही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा खर्च सध्याच्या 38 टक्क्यांवरून 42 टक्क्यांपर्यंत वाढेल.

कामगार मंत्रालयाने AICPI ची आकडेवारी जाहीर केली आहे. सप्टेंबरमध्ये हा आकडा 131.2 इतका होता. जूनच्या तुलनेत सप्टेंबर 2022 पर्यंत एकूण AICPI निर्देशांक 2.1 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या महिन्याच्या ऑगस्टच्या तुलनेत 1.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे AICPI निर्देशांक अजून आली नाही.

किमान पगारावर गणना

कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन रु. 18,000
नवीन महागाई भत्ता (42%) रु.7560/महिना
आत्तापर्यंतचा महागाई भत्ता (38%) रु.6840/महिना
किती महागाई भत्ता वाढला 7560-6840 = रु 720/महिना
वार्षिक पगारात 720X12 = 8640 रुपये वाढ

किमान पगारावर गणना

कर्मचार्‍यांचे मूळ वेतन रु 56900
नवीन महागाई भत्ता (42%) रु 23898/महिना
आतापर्यंत महागाई भत्ता (38%) रुपये 21622/महिना
किती महागाई भत्ता वाढला 23898-21622 = रु 2276/महिना
वार्षिक पगारात वाढ 2276X12 = रु. 27312

या लोकांना होणार जास्त फायदा

महागाई भत्त्यात वाढ झाली तर एकूण 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे. सरकारने वर्षाच्या सुरुवातीला महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ केली होती, त्यामुळे महागाई भत्ता ३४ टक्क्यांवर गेला होता. आता पुन्हा एकदा डीए 4 टक्क्यांनी वाढवला तर महागाई भत्ता 38 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.

महागाई भत्त्यात वर्षातून दोनवेळा सुधारणा केली जाते

सरकारकडून महागाई भत्त्यात वर्षातून दोनवेळा सुधारणा केली जाते. प्रथम जानेवारी ते जून तर दुसऱ्यांदा जुलै ते डिसेंबर दरम्यान सुधारणा केली जाते.

केंद्र सरकारने जर महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ केली तर कर्मचाऱ्यांच्या पगारातही खूप मोठी वाढ होईल. दरम्यान हे कर्मचारी 18 महिन्यांच्या थकीत डीएची वाट पाहत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe