Pik Vima : खरीप हंगामात शेतकरी बांधवांना पावसाच्या लहरीपणामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. अशा परिस्थितीत पिक विमा काढलेल्या शेतकरी बांधवांना पिक विमा नुकसान भरपाई मिळेल आणि थोडासा दिलासा मिळेल अशी आशा होती.
मात्र विमा कंपन्यानी शेतकरी बांधवांचा मोठा विश्वासघात केला आहे. अनेक पिक विमा धारक शेतकरी बांधवांना शंभर दोनशे रुपये नुकसान भरपाई कंपन्यांकडून वर्ग करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पिक विमा कंपनी म्हणजेच शासनाच्या अवघड जागेवरच दुखणं असं काहीसं चित्र निर्माण होत आहे.
एका मीडिया रिपोर्ट नुसार राज्यातील जवळपास 42 हजार शेतकरी बांधवांना पिक विमा कंपन्यांकडून एक हजार रुपयांच्या आत नुकसान भरपाई देण्यात आली आहे. म्हणून शेतकऱ्यांची ही थट्टा माजवली जात असल्याचा आरोप होत आहे. शेतकरी बांधवांनी जेवढा विम्याचा हप्ता भरलेला आहे तेवढी देखील रक्कम त्यांना नुकसान भरपाई म्हणून मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात आणि पिक विमा कंपन्यांविरोधात कमालीची संतप्त भावना पाहायला मिळत आहे.
खरीप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं या अनुसंघाने 23 लाख 30000 शेतकरी बांधवांनी संबंधित पिक विमा कंपन्यांकडे पूर्व सूचना दिल्या. यापैकी तेरा लाख 74 हजार पूर्वसूचना मान्य करण्यात आल्या आणि या शेतकरी बांधवांना 998 कोटी रुपयांची पिक विमा नुकसान भरपाई मिळाली. यामध्ये पाच लाख 13 हजार शेतकरी बांधवांच्या पूर्वस सूचना अमान्य किंवा अपात्र ठरविण्यात आले आहे.
अशा परिस्थितीत कृषी विभागाकडून या रद्द झालेल्या पूर्वसूचनेच पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याचे आदेश संबंधित पिक विमा कंपन्यांना देण्यात आले आहे. मात्र पीक विमा कंपन्यांकडून यामध्ये फारसं लक्ष घातलेलं दिसत नाही. पिक विमा कंपन्याच्या या अनागोंदी कारभारामुळे बाधित शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
खरं पाहता एक हजार रुपयांपेक्षा कमी जर पिक विमा नुकसान भरपाई शेतकरी बांधवांना मिळत असेल तर शासनाकडून कमी असलेली रक्कम भरपाई म्हणून दिले जाते. शासनाकडून फरकाची रक्कम कंपनीला दिली जाते आणि कंपनीकडून शेतकऱ्यांना वर्ग केली जाते.