Car Price : कार खरेदी करणाऱ्यांना बसणार नवीन वर्षात डबल फटका! कंपन्यांसोबत बँकांनीही केली मोठी घोषणा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Car Price : नवीन वर्ष सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहे. या वर्षात अनेक जण नवीन कार घेतात. जर तुम्हीही नवीन कार घेण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला आर्थिक फटका बसणार आहे.

कारण कार उत्पादक कंपन्यांनी कार महाग होणार असल्याचे आधीच जाहीर केले होते. अशातच आता बँकांनीही मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे नवीन कार घेणाऱ्यांना आता डबल फटका बसणार आहे.

असा बसेल फटका

एकीकडे कार कंपन्या कारच्या किमती वाढवण्याच्या तयारीत असून त्याबाबत घोषणा केल्या जात आहेत. तर दुसरीकडे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कार कर्ज महाग करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता नवीन वर्षात नवीन गाड्या खरेदी करणाऱ्यांना डबल फटका बसणार आहे.

कंपन्यांनी केली ही घोषणा

नवीन वर्षाच्या अगोदरच कार कंपन्यानी कारच्या किमती वाढणार असलयाचे सांगितले आहे. यामध्ये मारुती, किया, मर्सिडीज, ऑडी, रेनॉल्ट, एमजी, टाटा यांसारख्या दिग्ग्ज कंपन्यांही 1 जानेवारी 2023 पासून कार खरेदीसाठी जास्त किंमत मोजावी लागणार असल्याचे सांगितले आहे.

का वाढत आहेत किमती

कच्च्या मालाच्या किमतीसोबतच इतर कारणांमुळे कारच्या किमती वाढणार असल्याचे कार कंपन्यांचे मत आहे. त्याचबरोबर वाढलेली किंमत जास्त काळ सहन करणे कंपन्यांना शक्य नाही. त्यामुळेच कारच्या किमतीत वाढ करण्यात येणार असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.

कार लोन महागणार

दरम्यान, याबाबत बुधवारीच रिझर्व्ह बँकेची बैठकअसून बैठकीनंतर आरबीआयकडून रेपो दरात 35 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. त्यामुळे कार लोन महाग होणार हे जवळपास स्पष्ट झाले. कार खरेदी करत असताना तुम्हाला आता पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय द्यावा लागणार आहे.

कार उत्पादक कंपन्या आणि बॅँकेने केलेल्या या घोषणेमुळे ग्राहकांची निराशा झाली आहे. घोषणेमुळे त्यांना आता नवीन कार खरेदी करत असताना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.