PAN card : जर तुम्ही पॅन कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 31 मार्च 2023 पूर्वी पॅन कार्डधारकांनी त्यांचे पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करणे गरजेचे आहे.
जर तुम्ही लिंक केले नाहीतर आयकर विभागाकडून तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल. आयकर विभागाकडून यापूर्वीही लिंक करण्याच्या सूचना कार्डधारकांना देण्यात आल्या होत्या.

कलम 1961 अंतर्गत, सर्व पॅन कार्डधारकांना त्यांचे पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही हे काम 31 मार्च 2023 पूर्वी केले नाही तर ते निष्क्रिय केले जाईल.
त्यामुळे जर तुम्ही 1 एप्रिलपासून तुमचे पॅनकार्ड वापरू शकणार नाही.
त्यामुळे तुम्हाला जेवढे लवकर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करता येईल तितके लवकर लिंक करा. हे लक्षात घ्या की सध्या पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी 1000 रुपये उशिरा दंड भरावा लागत आहे.
आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. लिंक करण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.