Jaggery Benefits : गुळामुळे शरीराला होतात आश्चर्यकारक फायदे, जाणून व्हाल हैराण

Published on -

Jaggery Benefits : फार प्राचीन काळापासून भारतीयांच्या आहारात गुळाचा वापर करतात. एखादा सण असेल तर त्यादिवशी गुळाचा जास्त वापर केला जातो.

आजही प्रवासाने दमलेल्या व्यक्तीच्या हातावर गुळाचा खडा ठेवण्याची प्रथा आहे. जर तुम्ही गूळ खाल्ला तर त्याचे शरीराला आश्चर्यकारक फायदे होतात. प्रत्येक डॉक्टर रुग्णांना गूळ खाण्याचा सल्ला देतात.

गुळामध्ये असतात अनेक पोषक तत्व

गुळामध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक, मॅग्नेशियम, सुक्रोज, ग्लुकोज, आयर्न ही घटक गुळात पुरेशा प्रमाणात आढळतात. व्हिटॅमिन ए आणि बी जीवनसत्त्वही गुळात पुरेशा प्रमाणात असते. त्यामुळेच गूळ खाल्याने खूप समस्या दूर होतात.

सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत नाही

थंडीच्या दिवसात दररोज आल्याबरोबर गुळाचा चहा प्यायला तर तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवणार नाही, कारण या दिवसात गुळाचा चहा तुम्हाला आतून उबदार ठेवतो.

लोहाची कमतरता जाणवत नाही

थंडीत लोहाची कमतरता जाणवते, त्यामुळे शरीरात अशक्तपणाही जाणवतो. परंतु जर तुम्ही गुळ खाल्ला तर ही समस्या जाणवत नाही, तसेच तो रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत करते.

पचनक्रिया सुधारते

गूळ खाल्ला तर पोट साफ राहते, तसेच आजारांचा धोका राहत नाही. पोट साफ असल्याने अॅसिडिटी होत नाही आणि पचनक्रियाही सुधारते, त्यामुळे डॉक्टर गूळ खाण्याचा सल्ला देतात.

कोमट दुधात गूळ मिसळून प्यावे

थंडीच्या दिवसात दुधात गूळ मिसळून पिणे देखील खूप फायदेशीर ठरते, कारण यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. तर दूध हे गुणांचे भांडार असते, त्यामुळे जर तुम्ही कोमट दुधात गुळ मिसळून सेवन केला तर फायद्याचे ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News