Amazon Offer : स्मार्टफोन प्रेमींसाठी एक खुशखबर आहे. कारण सध्या iQOO च्या स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर मिळत आहे. विशेष म्हणजे कंपनीचा हा 5G स्मार्टफोन आहे.
या स्मार्टफोनची किंमत 49,990 रुपये इतकी आहे. परंतु, ऑफरमुळे तुम्ही हा फोन स्वस्तात खरेदी करू शकता. ग्राहकांना ही सवलत Amazon India वर मिळत आहे. त्यामुळे स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी गमावू नका.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
या फोनमध्ये, कंपनी 2376×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.56-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले देत असून हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. त्याशिवाय या डिस्प्लेची पीक ब्राइटनेस पातळी 1200 nits आहे. फोन 8 GB + 128 GB आणि 12 GB + 256 GB या व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे . या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888+ 5G प्रोसेसर देत आहे.
त्याचबरोबर फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे दिले जात आहेत. यामध्ये 13-मेगापिक्सेल वाइड अँगल लेन्स आणि 13-मेगापिक्सेल पोर्ट्रेट लेन्स व्यतिरिक्त 48-मेगापिक्सेल गिम्बल प्राइमरी लेन्स आहे. सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळत आहे.
इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज आहे. तर या फोनमध्ये 4350mAh बॅटरी असून ती 120W फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते. हे तंत्रज्ञान फोनची बॅटरी फक्त 6 मिनिटांत 50% पर्यंत चार्ज करते, असा कंपनीचा दावा आहे. जोपर्यंत OS चा संबंध आहे, फोन Android 12 वर आधारित Funtouch OS 12 वर काम करतो.