Top 10 Bikes : ऑक्टोबर 2022 मध्ये या विभागातील टॉप 10 मोटारसायकलींमध्ये 40.52 टक्के (वर्षानुवर्षे) वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये, 150-200 सीसी सेगमेंटमध्ये 1,27,415 बाईक विकल्या गेल्या, तर ऑक्टोबर 2022 मध्ये 1,79,043 बाइक विकल्या गेल्या आहेत.
दरम्यान, या यादीमध्ये बजाज पल्सर सीरिजने 150-200 cc सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या मोटारसायकलींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
ऑक्टोबर 2022 मध्ये एकूण 49,389 युनिट्सची विक्री झाली आहे तर ऑक्टोबर 2021 मध्ये 31,902 युनिट्सची विक्री झाली आहे. म्हणजेच त्याच्या विक्रीत 54.81 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या TVS Apache श्रेणीने, 2.99 टक्के वार्षिक वाढीसह, ऑक्टोबर 2022 मध्ये 40,988 युनिट्सची विक्री केली आहे जी मागील वर्षी याच कालावधीत 39,799 युनिट्सची विक्री झाली होती.
Honda Unicorn 150 ची विक्री वार्षिक आधारावर 351.97 टक्क्यांनी वाढून ऑक्टोबर 2022 मध्ये 31,986 युनिट्सवर पोहोचली, जी ऑक्टोबर 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 7,077 युनिट्सपेक्षा जास्त आहे.
यासह तो तिसऱ्या क्रमांकावर राहिला. यानंतर यामाहा एफझेड चौथ्या स्थानावर आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये 13,404 युनिट्सची विक्री झाली, त्या तुलनेत ऑक्टोबर 2022 मध्ये विक्री 52.49 टक्क्यांनी वाढली आणि 20,440 युनिट्सवर पोहोचली.
Yamaha ची R15 पाचव्या क्रमांकावर आहे, ऑक्टोबर 2022 मध्ये 10,541 युनिट्सची विक्री झाली, ऑक्टोबर 2021 मध्ये 10,246 युनिट्सची विक्री झाली. विक्रीत त्याची वार्षिक वाढ 2.88 टक्के आहे.
यानंतर, Yamaha MT15 सहाव्या क्रमांकावर राहिला, तिची विक्री 33.59 टक्क्यांनी (वर्षानुवर्षे) वाढली आणि ऑक्टोबर 2021 मध्ये 6,016 युनिट्सच्या तुलनेत ऑक्टोबर 2022 मध्ये 8,037 युनिट्सवर पोहोचली.
Hero Xtreme 160R (5,164 युनिट्स), KTM 200 (4,002 युनिट्स), Xpulse 200 (2,972 युनिट्स) आणि बजाज एव्हेंजर (1,649 युनिट्स) अनुक्रमे सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत. वार्षिक आधारावर बजाज अॅव्हेंजर सीरिजच्या विक्रीत 41125 टक्क्यांनी वाढ झाली आहे.