Indian Railways : देशभरातील असंख्य लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात. परंतु, रेल्वेने प्रवास करत असताना गरजेचे असते ते म्हणजे रेल्वेचे तिकीट.
जर तुमच्याकडे रेल्वेचे तिकीट नसेल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. अनेकजणांवर रेल्वे प्रशासन दररोज तिकीट नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करते.

परंतु, तुम्ही वेटिंग तिकिटाच्या मदतीने प्रवास करू शकता. हा नियम फार कमी जणांना माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला आता प्रवास करताना तिकिटाची गरज भासणार नाही, तुम्ही आता प्लॅटफॉर्म तिकिटाच्या मदतीने प्रवास करू शकता.
रेल्वेच्या या नियमानुसार, जर तुमच्याकडे प्रवास करण्यासाठी आरक्षण तिकीट नसेल तरीही तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन रेल्वेमध्ये प्रवास करू शकता.
परंत्तू, तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळविण्यासाठी तिकीट तपासकाकडे जावे लागेल. तसेच सीट रिकामी नसेल तर TTE तुम्हाला कन्फर्म ट्रेन तिकीट देणार नाही. तुम्हाला वेटिंग तिकिटावरच प्रवास करावा लागेल.
हे लक्षात ठेवा की,जर तुमच्याकडे प्लॅटफॉर्म आणि आरक्षण तिकीट नसेल तर तुमच्याकडून 250 रुपये दंड आणि प्रवासाचे पूर्ण भाडे घेतले जाईल.
टीटीला तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट जिथून प्लॅटफॉर्म तिकीट घेतले ते स्टेशन आणि निर्गमन स्टेशन दाखवावे लागेल. त्यामुळे तुम्हाला त्याच श्रेणीचे भाडे भरावे लागेल.