Hyundai Santro Removed : ‘त्या’ ग्राहकांना धक्का! बंद होणार सॅन्ट्रो? वेबसाइटवरूनही हटवली

Published on -

Hyundai Santro Removed : भारतीय बाजारपेठेत ह्युंदाईने आपली वेगळी ओळख तयार केली आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून कंपनीच्या सॅन्ट्रो या कारची मागणी कमी झाली होती.

त्यामुळे कंपनीने आता ती कार वेबसाइटवरून काढून टाकली आहे. त्यामुळे कंपनीच्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. लाँच झाल्यानांतर सॅन्ट्रोने मार्केटमध्ये धुमाकूळ घातला होता.

वेबसाइटवरून हटवली सॅन्ट्रो

कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर सॅन्ट्रो कार काढून टाकली आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत ही कार कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आली होती.

उत्पादन अगोदरच थांबले होते

मागणी कमी असल्यामुळे अगोदरच कंपनीने या कारचे उत्पादन थांबवले होते. त्यामुळे कंपनी मार्केटमध्ये पेट्रोल व्हेरियंटऐवजी आपला सीएनजी प्रकार विकत होती. अहवालानुसार साठाही संपला आहे. त्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

सीएनजीमध्येही उपलब्ध होती

सँट्रोची लांबी 3610 मिमी आणि रुंदी 1645 मिमी होती. हे 1100 सीसी पेट्रोल इंजिन तसेच सीएनजी पर्यायाने समर्थित होते. तर बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 4.89 लाख रुपयांपासून सुरू होती. तर सँट्रोच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 6.41 लाख रुपये इतकी होती.

ही फॅमिली कार होती

ही फॅमिली कार होती. भारतीय बाजारात कंपनीने ही कार 1998 मध्ये आणली होती. त्यावेळी मारुती छोट्या कारच्या सेगमेंटमध्ये आघाडीवर होती. इतर कंपन्यांना आव्हान देत या कारने बाजारपेठेत आपली जागा निर्माण केली होती. त्यानंतर कंपनीने ही कार 2014 मध्ये बंद करून 2018 मध्ये पुन्हा लॉन्च केली होती.

आता मिळणार या कार

आता कंपनीच्या वेबसाइटवर फक्त तीन हॅचबॅक कार आहेत. यामध्ये Grand I-10, I-20 आणि I-20 N लाइनचा समावेश आहे. कंपनीची Grand i10 ही सर्वात स्वस्त कार असून प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 5.43 लाख रुपये इतकी आहे.

कंपनीच्या वतीने ग्रँड i10 पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या पर्यायासह उपलब्ध करून दिले आहे. परंतु, पुढील वर्षाच्या सुरुवातीला त्याचे डिझेल प्रकार बंद केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News