Pure EV Eco Dryft : सध्या देशातील इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत त्यामुळे अनेकजण इलेक्ट्रिक वाहने खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने सादर करू लागल्या आहेत.
अशातच Pure EV ने आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक सादर केली आहे. ही बाईक सिंगल चार्जमध्ये 135 किमी रेंज देईल असा दावा कंपनीने केला आहे. लवकरच ही बाईक मार्केटमध्ये लॉन्च केली जाईल.
PURE EV EcoDryft मोटर आणि बॅटरी
या इलेक्ट्रिक बाइकमध्ये 3.0 kWh क्षमतेच्या लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे. हा बॅटरी पॅक AIS 156 प्रमाणित आहे. कंपनीने बाइकमध्ये दिलेल्या बॅटरी आणि मोटरच्या पॉवरशी निगडित कोणतीही डिटेल्स उघड केले नाही. ही माहिती लॉन्च करताना शेअर करण्याची शक्यता आहे.
PURE EV EcoDryft रेंज आणि स्पीड
कंपनीने या इलेक्ट्रिक बाईकच्या रेंज आणि टॉप स्पीडबाबत मोठे दावे केले आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही बाइक एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 135 किमी अंतर कापू शकते. यासोबतच त्याचा टॉप स्पीड 75 किमी प्रतितास इतका आहे.
PURE EV EcoDryft कलर ऑप्शन
या बाईकच्या लुक आणि डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, ती एक बेसिक कम्युटर बाइकसारखी दिसते. या बाईकमध्ये अँगुलर हेडलॅम्प, पाच स्पोक अलॉय व्हील्स, सिंगल पीस सीट, आकर्षक डिझाइनची इंधन टाकी आहे. ही बाईक ब्लॅक, ग्रे, ब्लू आणि रेड या चार रंगांमध्ये उपलब्ध आहे.
PURE EV EcoDryft ब्रेकिंग आणि सस्पेन्शन
या बाईकच्या फ्रंट व्हीलमध्ये कंपनीने डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक दिले आहेत ज्यात कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम उपलब्ध असून सस्पेन्शन सिस्टीममध्ये, याला समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शन आणि मागील बाजूस स्प्रिंग बेस्ड शॉक ऍब्जॉर्बर सस्पेन्शन मिळते.
स्पर्धा
लॉन्च झाल्यानंतर ही बाईक Revolt RV400, Tork Kratos, Oben Rorr आणि भारतीय बाजारपेठेत अलीकडेच सादर केलेल्या मॅटर इलेक्ट्रिक बाईकला टक्कर देईल.