Traffic Challan : लहान मुलाला दुचाकीवर बसवत असाल तर जाणून घ्या ‘हा’ नियम, नाहीतर भरावा लागेल दंड

Ahmednagarlive24 office
Published:

Traffic Challan : देशात दररोज कितीतरी अपघात होतात. यामध्ये काही जणांचा मृत्यू होतो. त्यामुळे वाहतुकीसंदर्भात नियम कडक केले आहेत. तरीही अनेकजण या नियमाचे उल्लंघन करत असल्याचे आपण पाहतो.

तर अनेकांकडून नकळत नियम मोडला जातो. जर तुम्ही लहान मुलाला दुचाकीवर बसवत असाल तर यासंबंधी नियम जाणून घेणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागेल.

या नियमांचे करा पालन

ज्या ठिकाणी पोलीस तैनात नसतात त्या ठिकाणी अनेक रस्त्यांवर किंवा महामार्गांवर कॅमेरे बसवलेले आहेत. याचाच फायदा काही जण घेऊन नियमांचे उल्लंघन करतात, परंतु, त्यांच्यावर ऑनलाईन नजर ठेवली जाते. त्यांना ऑनलाइन चलन पाठवले जाते.

लहान मुलांना दुचाकीवर बसवले असेल तर

नवीन मोटार वाहन कायद्यांतर्गत, चार वर्षांवरील बालकाची तिसरी प्रवासी म्हणून गणना करण्यात येणार आहे. दुचाकीवर फक्त दोनच लोकांना बसण्यास परवानगी आहे.

जर तुम्ही चार वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाला दुचाकीवर बसवले तर तुमचे चलन कापले जाते. याशिवाय सायलेंट झोन असणाऱ्या रस्त्यावर वाहन थांबवून बोलत असाल, तर तुमचे चलन कापले जाते.

ही आहे चलन यादी

अतिवेगाने गाडी चालवली तर 1000 रुपये, परवान्याशिवाय गाडी चालवली तर 5000 रुपये, लाल सिग्नल तोडला तर 500 रुपये, हेल्मेट न घातल्यास हजार रुपये तर विम्याशिवाय गाडी चालवली तर रु. 2000 इ.अशी दंडाची लिस्ट आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe