Samsung Galaxy M04 : समसंगचा ‘हा’ स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या ऑफर

Ahmednagarlive24 office
Published:

Samsung Galaxy M04 : नुकताच Samsung ने Galaxy M04 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. तुम्हाला हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करायचा आहे का?

जर तुमचे बजेट नसेल आणि तुम्हाला स्वस्तात फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्याकडे एक सुवर्णसंधी आहे. कारण या स्मार्टफोनवर मोठी सवलत मिळत आहे. या ऑफरअंतर्गत अर्ध्याहून कमी किमतीत हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.

स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy M04 हा स्मार्टफोन वॉटरड्रॉप-स्टाईल नॉचसह येतो. यामध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले असून 5,000mAh बॅटरी पॅक करतो आणि MediaTek Helio P35 SoC प्रोसेसरद्वारे समर्थित आहे.

तसेच LED फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 13-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा दुय्यम सेन्सर आहे. तसेच समोर 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा कंपनीने दिला आहे.

फीचर्स

या फोनमध्ये रॅम प्लस फीचर्स मिळत आहे, जे वापरकर्त्यांना एकूण 8GB RAM प्रदान करते. ऑनबोर्ड स्टोरेज 128GB पर्यंत आहे तर मायक्रोएसडी कार्डद्वारे (1TB पर्यंत) वाढवता येते. Samsung Galaxy M04 One UI 4.1 स्किनसह Android 12 वर चालेल. या स्मार्टफोनसाठी कंपनीने दोन वर्षांसाठी OS अपग्रेड देण्याचे आश्वासनही दिले आहे.

ऑफर

ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, ऑफर Amazon India (  http://Amazon.in ) वर मिळत आहे. तसेच तुम्हाला कंपनीच्या अधिकृत वेबसाइट http://Samsung.com वरून फोन खरेदी करता येईल. 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 9,499 रुपये आहे.

4GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 10,499 रुपये असून कंपनीने आपल्या फोनवर एक विशेष लॉन्च ऑफर दिली आहे. ज्या अंतर्गत ग्राहकांना सर्व SBI डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 1000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. तुम्ही कोणत्याही SBI कार्डने पैसे भरले तर तुम्हाला फोनच्या किमतीवर 1000 रुपयांची सूट मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe