Car Buyer Guide : नागरिकांनो लक्ष द्या! ‘या’ वाहनांमध्ये कधीच करू नका प्रवास नाहीतर कापले जाईल चलन

Published on -

Car Buyer Guide : आपण रस्त्यांवर अनेक वाहने पाहतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अनेकजण बस, दुचाकी किंवा चारचाकीचा वापर करतो. तसेच आपल्याला वाहतुकीचे नियम माहीत असणे खूप गरजेचे आहे.

जर तुम्ही व्यावसायिक वाहनांमधून प्रवास करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण ट्रॅफिक पोलिसांना तुम्ही सापडला तर तुमच्याकडून खूप मोठे चलन कापले जाऊ शकते.

वाहतूक कर नियमांनुसार, जर तुम्ही एखाद्या व्यावसायिक वाहनातून लोकांना घेऊन जात असाल किंवा तुमच्या व्यवसायाशी निगडित वस्तूंची वाहतूक करण्यासाठी प्रवासी वाहन वापरत असाल तर तुम्हाला दंड भराव लागू शकतो.

काय आहे नियम ?

दिल्ली वाहतूक नियमांनुसार, जर तुम्ही व्यावसायिक वाहनांमध्ये लोकांना घेऊन जात असाल तर तुम्हाला 9,090 रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल तसेच तुमहाला दुसऱ्या वेळेस पकडले गेले तर तुम्हाला एकूण 18,180रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली असून ती ठिकाणानुसार बदलू शकते.

व्यावसायिक वाहनांची वाढत आहे मागणी

सध्या देशात व्यावसायिक वाहनांची मागणी वाढत आहे. गेल्या महिन्याबद्दल बोलायचे झाले तर टॉप 5 व्यावसायिक वाहन विक्री करणार्‍या कंपन्यांची वार्षिक वाढ खूप वाढली आहे.

आकडेवारीनुसार नोव्‍हेंबर 2022 मध्‍ये टाटा ही व्‍यावसायिक वाहनांची सर्वात मोठी विक्री करणारी कंपनी होती, जिने एकूण 30,282 युनिटची विक्री केली. टाटाला वार्षिक आधारावर 14.41 टक्के वाढ मिळाली असून त्यापाठोपाठ महिंद्रा, अशोक लेलँड, VECV आणि मारुती यांचा नंबर लागतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News