7th Pay Commission : वर्ष 2022 संपण्याच्या दिशेने वाटचाल सुरु असून लोक नववर्षाच्या स्वागताची तयारी करत आहेत. अशा वेळी जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुम्हाला नववर्षात मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मोदी सरकार देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3 मोठ्या भेटवस्तू देणार आहे. सरकार नवीन वर्षाच्या सुरुवातीला आणि 2023 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करू शकते.
केंद्र सरकारचे कर्मचारी अनेक महिन्यांपासून केंद्राकडून काही मोठ्या निर्णयांची वाट पाहत असून येत्या नवीन वर्षात त्यांना केंद्राकडून पगारवाढीशी संबंधित 3 भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे.
यामध्ये महागाई भत्त्यात वाढ, फिटमेंट फॅक्टर आणि महागाई भत्त्याची थकबाकी भरणे समाविष्ट आहे. बातम्यांमध्ये असे सांगितले जात आहे की नवीन वर्ष 2023 मध्ये लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून त्यांची भेट मिळू शकते.
महागाई भत्त्यात वाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाईचा दर पाहता नवीन वर्षात डीएमध्ये 3 ते 5 टक्क्यांनी वाढ केली जाऊ शकते. अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने 01.07.2022 पासून देय असलेल्या सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 4% महागाई भत्ता आणि महागाई सवलत मंजूर केली आहे.
18 महिन्यांच्या डीए थकबाकीबाबत निर्णय
विशेष म्हणजे, जानेवारी 2020 ते जून 2021 या 18 महिन्यांचा डीए अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे 18 महिन्यांचा DA काढला तर तो हजारो रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. अशा परिस्थितीत येत्या वर्षभरात 18 महिन्यांच्या थकीत महागाई भत्त्याबाबत निर्णय होऊ शकतो, अशी आशा कर्मचाऱ्यांना आहे.
फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ
कर्मचाऱ्यांमध्ये फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. त्यामुळे फिटमेंट फॅक्टर वाढविण्याचा निर्णय पुढील वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर मोदी सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टर वाढल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होईल.