Honor : 5000mAh बॅटरीसह लाँच झाला धमाकेदार स्मार्टफोन, खूप कमी किमतीत खरेदी करता येणार

Ahmednagarlive24 office
Published:

Honor : सध्याच्या काळात प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. क्वचितच लोकांकडे स्मार्टफोन नसेल. भारतीय बाजारात अनेक दिग्ग्ज कंपन्यांचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. यामध्ये प्रत्येक रेंजमध्ये स्मार्टफोन पाहायला मिळतात.

काहीजणांचे बजेट जास्त असते तर काहीजणांचे बजेट हे खूप कमी असते. अशातच मार्केटमध्ये सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच झाला आहे. Honor या नामंकित कंपनीचा Honor X5 स्मार्टफोन लाँच झाला आहे.

स्पेसिफिकेशन

कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे, जो वॉटरड्रॉप नॉच डिझाइनमध्ये येतो. मागील बाजूस लेदर टेक्सचर आहे. तर फोनमध्ये MediaTek Helio G25 प्रोसेसर आणि 2 GB RAM सह 32 GB पर्यंत स्टोरेजचा सपोर्ट दिला आहे.

Android 12 GO एडिशन यामध्ये उपलब्ध आहे. हे लक्षात घ्या की या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर सपोर्ट दिला नसून सुरक्षेसाठी फेस अनलॉक फीचर दिले आहे.

कॅमेरा आणि बॅटरी

यामध्ये सिंगल रियर कॅमेरा असून तो 8 मेगापिक्सेलचा आहे. कॅमेऱ्यासोबतच एलईडी फ्लॅश आणि 1080p व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी सपोर्ट दिला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 5-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिला आहे. 5,000 mAh ची बॅटरी आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी, मायक्रो-यूएसबी पोर्ट, 3.5 मिमी ऑडिओ जॅक, 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ आणि ड्युअल सिम सपोर्ट आहे.

किंमत

हा स्मार्टफोन सनराइज ऑरेंज, ओशन ब्लू आणि मिडनाईट ब्लॅक अशा ३ कलर पर्यायांमध्ये येईल. सध्या हा फोन जागतिक बाजारात लॉन्च केला असून 2 GB रॅम सह 32 GB स्टोरेजची किंमत 99 युरो म्हणजेच 8,700 रुपये इतकी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe