Tata Tiago XE CNG : संपूर्ण देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती खूप वाढल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांकडे पाठ फिरवली आहे.
अनेकजण CNG वर चालणाऱ्या वाहनांकडे वळू लागले आहेत. तुम्ही आता स्वस्तात CNG कार खरेदी करू शकता. कारण Tata Tiago XE CNG या कारवर एक सवलत मिळत आहे.
Tata Tiago XE CNG किंमत
Tata Tiago XE CNG ची सुरुवातीची किंमत 6,34,900 रुपये इतकी एक्स-शोरूम, दिल्ली आहे. तर ऑन-रोड, ही किंमत 7,16,638 रुपये होते.
ऑन रोड किंमत
ऑन-रोड किमतीचा विचार केला तर तुम्हाला ही कार रोख स्वरूपात खरेदी करण्यासाठी 7.17 लाख रुपये मोजावे लागतील. परंतु,फायनान्स प्लॅनद्वारे ही कार 52 हजार रुपयात घरी घेऊन जाऊ शकता.
फायनान्स प्लॅन
ऑनलाइन डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार या कारसाठी तुमचे बजेट 52,000 रुपये असेल तर बँक तुम्हाला 6,64,638 रुपयांचे कर्ज देऊ शकते. रकमेवर बँक वार्षिक ९.८ टक्के व्याज आकारू शकते.
या कारसाठी कर्ज मंजूर झाले तर तुम्हाला 52,000 रुपये डाउन पेमेंट जमा करून पुढच्या 5 वर्षांसाठी महिन्याला 14,056 रुपये मासिक EMI भरावा लागेल.
इंजिन आणि ट्रान्समिशन
या CNG कारमध्ये 1199 cc इंजिन दिले असून जे 72 bhp पॉवर आणि 95 Nm पीक टॉर्क जनरेट करते. तसेच या इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन कंपनीने दिले आहे.
मायलेज
टाटा टियागो सीएनजी एक किलो सीएनजीवर 26.49 किमी मायलेज देत असल्याचा मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.