5 Most Expensive Mobiles : तुम्ही जर ब्रँडेड स्मार्टफोन्सचे शौकीन असाल तर आज आम्ही अशा फोन्सची यादी घेऊन आलो आहे ज्याची बाजारात किंमत कोटींच्या घरात आहे.
मात्र, हे फोन फार कमी लोक वापरतात. आता आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या फोनबद्दल सांगत आहोत.
या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाला iPhone 3G Kings Button हा फोन आहे. याची किंमत $2.5 दशलक्ष आहे. हा फोन ऑट्रेन डिझायनर पीटर एलिसनने डिझाइन केला आहे.
या फोनच्या डिझाईनसाठी 18 कॅरेट पिवळे, पांढरे आणि गुलाब सोने वापरण्यात आले आहे. याशिवाय आयफोनच्या आजूबाजूला पांढऱ्या सोन्याची पट्टी देण्यात आली आहे. त्याला 138 हिऱ्यांनी सजवण्यात आले आहे. यासोबतच फोनच्या होम बटनमध्ये 6.6-कॅरेट सिंगल कट डायमंड बसवण्यात आला आहे.
Goldstriker 3GS सुप्रीम फोन 200 हिरे आणि 22 कॅरेट सोन्याच्या 71 ग्रॅमपासून बनवला आहे. त्याची किंमत $3.2 दशलक्ष (सुमारे 32 कोटी रुपये) आहे. कंपनीने फोनच्या होम बटनमध्ये 7.1 कॅरेट सिंगल कट डायमंड दिला आहे.
या यादीत पुढील नाव आहे iPhone4 Diamond Rose Edition चे. स्टुअर्ट ह्युजेसने त्याची रचना केली आहे. या फोनची किंमत 8 मिलियन डॉलर (सुमारे 65 कोटी रुपये) आहे. कंपनीने याचे फक्त दोन मॉडेल बनवले आहेत.
हा फोन सॉलिड रोझ गोल्ड आणि 100 कॅरेटच्या 500 हिऱ्यांपासून बनवला आहे. या फोनच्या लोगोमध्ये 53 हिरे लावण्यात आले आहेत. एवढेच नाही तर फोनच्या होम बटणावर 7.4 कॅरेट सिंगल कट पिंक डायमंड लावण्यात आला आहे.
लक्झरी फोन्सच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर स्टुअर्ट्स ह्यूजेसचा आयफोन आहे. या फोनची किंमत $9.4 मिलियन (सुमारे 76 कोटी रुपये) आहे. या iPhone 4s चे मॉडेल 24 कॅरेट सोन्यापासून बनवण्यात आले आहे.
यात प्रत्येकी 1000 कॅरेटचे 500 हिरे आहेत. फोनच्या मागील पॅनल आणि लोगोमध्ये 24 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला आहे. फोनमध्ये 8.6-कॅरेट सिंगल कट डायमंड देखील देण्यात आला आहे.