New Pension Scheme : महिन्याला मिळवा 5000 रुपये ! 40 व्या वर्षापर्यंत गुंतवणुकीची सुवर्णसंधी, नाहीतर करावा लागेल पश्चाताप

New Pension Scheme : केंद्र सरकार सर्व सामान्यांसाठी अनेक योजना सुरु करत असत. सरकारची अशीच एक योजना आहे जी तुम्हाला महिन्याला 5000 रुपये देते.

या योजनेचे नाव अटल पेन्शन योजना आहे. या योजनेत तुम्हाला महिन्याला पेन्शनची सुविधा दिली जाते. विशेष म्हणजे सरकारच्या या योजनेचा कोणालाही लाभ घेता येतो.

या योजनेनुसार, तुम्ही दर महिन्याला 5,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळवू शकता. ही एक सुरक्षित योजना असून जर तुम्हाला या योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर तुमच्याकडे बँक खाते, आधार कार्ड आणि मोबाईल फोन नंबर गरजेचा आहे. त्यानंतर पती आणि पत्नीला या योजनेचा लाभ घेता येतो. तसेच तुम्ही या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता.

असा घ्या योजनेचा लाभ

  • जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी बँक खाते खूप गरजेचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज भरावा लागेल.
  • हे लक्षात ठेवा की ही योजना फक्त 18 ते 40 वयोगटातील लोकांसाठी आहे.
  • लाभ मिळण्यासाठी अगोदर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर पेन्शनच्या स्वरूपात पैसे मिळतील.

अर्जदाराचे निधन झाल्यानंतर लाभ मिळतो का?

समजा अर्जदाराचा मृत्यू झाला तरीही लाभ सुरू राहतात. अर्जदाराऐवजी, त्याच्या किंवा तिच्या घरातील सदस्यांना- पत्नी किंवा पतीला फायदे मिळतात. तसेच जर दोघांचा एकाच वेळी किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाला तर मुलांना त्या योजनेचे फायदे मिळतात.