Airtel Recharge Plans : एअरटेलचे प्री-पेड आणि पोस्ट-पेड प्लॅन्स आहेत. हे सर्व प्लॅन ग्राहकांच्या खिशाला परवडणारे आहेत. काही प्लॅन्सवर डेटा,दररोज 100 एसएमएस आणि सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगसह सबस्क्रिप्शनही मोफत दिले जात आहे.
त्याचप्रमाणे FASTag वर 100 रुपयांची सवलतही दिली जात आहे. या सर्व प्लॅन्सच्या किमतीही त्याप्रमाणे जास्त नाहीत. हे प्लॅन्स नेमके कोणते कोणते आहेत ते पाहुयात.
499 रुपयांचा प्लॅन
एअरटेलच्या या प्रीपेड प्लॅनची किंमत 499 रुपये असून वैधता 28 दिवसांची आहे. यामध्ये दररोज 3 जीबी डेटा,दररोज 100 एसएमएस, सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगही उपलब्ध आहे. तसेच या प्लॅनमध्ये तुम्हाला Apollo 24|7 सर्कलचे मोफत सबस्क्रिप्शन त्याचबरोबर Wynkmusic वर मोफत प्रवेश दिला जाईल.
699 रुपयांचा प्लॅन
या प्रीपेड प्लॅनची किंमत 699 रुपये असून 56 दिवसांची वैधता आहे . यामध्येही दररोज ३ जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. तुम्हाला Wynk म्युझिकचे सबस्क्रिप्शन आणि Xstream अॅपचा अॅक्सेस दिला जाईल.
अपोलो 24/7 सर्कलचे मोफत सबस्क्रिप्शन त्याचबरोबर FASTag वर 100 रुपयांची सूट मिळत आहे.तसेच Amazon Prime चे मोबाइल सबस्क्रिप्शन 56 दिवसांसाठी उपलब्ध असणार आहे. खास गोष्ट म्हणजे यामध्ये डिस्ने + हॉटस्टारचे 3 महिन्यांसाठी सब्सक्रिप्शन मिळत आहे.