Citroen: तयार ठेवा बजेट! ‘या’ दिवशी लाँच होतेय Citroen eC3

Ahmednagarlive24 office
Published:

Citroen : फ्रेंच ऑटो कंपनी Citroen आपली पहिली इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही कार कंपनीच्या सध्याच्या मॉडेल Citroen C3 वर आधारित असणार आहे.

कंपनीच्या या पहिल्या इलेक्ट्रिक कारचे नाव Citroen eC3 आहे. नवीन वर्षात ही कार लॉंच होणार आहे. ही कार इतर कंपन्यांना कडवी टक्कर देणार आहे. कमी किमतीत कंपनी कार उपलब्ध करून देऊ शकते.

e-CMP वर आधारित डिझाईन 

कंपनी अनेक दिवसांपासून या कारची चाचणी करत आहे. त्यामुळे ती अनेक ठिकाणी स्पॉट झाली आहे. तेव्हा ती  पूर्णपणे झाकली गेली होती, त्यामुळे तिची पद्धत उघड होऊ शकली नाही.तिच्या समोरील बोनेटवर चार्जिंग पोर्ट दिसत होता.

तिचे डिझाइन पाहता, असे मानले जाते की ते Citroen eC3 हॅचबॅक असेल. या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन e-CMP वर डिझाइन केले आहे. सध्या जागतिक बाजारपेठेत फियाट पांडा इलेक्ट्रिक कार याच प्लॅटफॉर्मवर तयार केली  आहे.

डिझाइन आणि फीचर्स 

ही कार आयसीईला समांतर असण्याची दाट शक्यता आहे. विद्युतीकरणासाठी पुढील फेंडरवर काही हिरवे अॅक्सेंट आणि चार्जिंग पोर्ट मिळेल. तिची केबिन स्टँडर्ड मॉडेलपेक्षा अधिक प्रीमियम असेल.

eC3 मध्ये सध्या वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि Apple CarPlay, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह 10.0-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. यामध्ये ऑटोमॅटिक एसी, रिअर वायपर आणि वॉशर, इलेक्ट्रिक ओआरव्हीएम, रिअर डिफॉगर आणि क्रूझ कंट्रोल यांसारखी फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.

350Km पर्यंत असेल रेंज 

आतापर्यंत, कंपनीने बॅटरी आणि रेंजबद्दल कोणतीही माहिती उघड केली नसूनअहवालांनुसार, Citroën eC3 EV हे ICE मॉडेल प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. त्यामुळे त्याच्या बाह्यभागात फारसा बदल केला नाही.

कंपनी याला 50W बॅटरी पॅकसह देऊ शकते, जे जागतिक बाजारात विकल्या जाणार्‍या Peugeot e-208 सारखी दिसते. इलेक्ट्रिक मोटर 135 bhp पॉवर आणि 260 Nm टॉर्क जनरेट करेल. बॅटरीची WLTP-प्रमाणित रेंज 350Km इतकी आहे.

किंमत 

तज्ज्ञांच्या मते, या कारची किंमत 10 ते 15 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. या किमतीत अनेक कंपन्या पेट्रोल कार विकत आहेत. टाटा आगामी टियागो इलेक्ट्रिक देखील 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च करणार आहे. त्यामुळे या दोन गाड्यांमध्ये जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते. तसेच ती Tata Nexon EV साठी आव्हान देखील देऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe