Farmer Success Story : यावर्षी खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन आणि कापूस या दोन मुख्य पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात कापसाची शेती सर्वाधिक केली जाते. या कापसाच्या आगारात देखील यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
परिणामी शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा भ्रूदंड बसला. मात्र अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील काही शेतकऱ्यांनी आपल्या योग्य नियोजनाच्या जोरावर विक्रमी उत्पादन घेण्याची किमया साधली आहे.
सेनगाव तालुक्यातील मौजे केनसुला येथील गजानन काळे आणि त्यांच्या सौभाग्यवती भाग्यश्री यांनी देखील अडीच एकर बागायती कापसातून 41 क्विंटल एवढे विक्रमी उत्पादन मिळवत पंचक्रोशीत आपलं नाव गाजवलं आहे. विशेष म्हणजे त्यांना या अडीच एकरातून अजून दोन ते तीन क्विंटल कापूस उत्पादन मिळण्याची आशा आहे.
खरं पाहता, कापूस उत्पादनासाठी मराठवाडा विदर्भ आणि खानदेश हे तीन प्रांत विशेष ओळखले जातात. या तीनही विभागात यंदा शेतकरी बांधवांना अपेक्षित असे उत्पादन मिळालेला नाही. अनेक शेतकऱ्यांना एकरी तीन ते चार क्विंटल एवढं कापूस उत्पादन मिळाला आहे. यामुळे शेतकरी कुठे ना कुठे मेटाकुटीला झाला आहे.
आशातच प्रयोगशील शेतकरी गजानन यांनी केलेले योग्य नियोजन आणि मिळवलेलं विक्रमी उत्पादन शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. गजानन यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी कापसाची लागवड मे महिन्याच्या शेवटी केली. चार फूट बाय दोन फूट अंतरावर कापूस लागवड झाली.
राशी 779 बी टी कापूस लागवड करण्यात आला. या ठिकाणी एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे त्यांनी यासाठी मजुराचा वापर केला नाही. स्वतः कापूस लागवड केली. यामुळे सुरुवातीपासूनच उत्पादन खर्चात बचत करण्याचा त्यांचा मानस स्पष्टपणे दिसत आहे.
कापूस लागवड केल्यानंतर पंधरा दिवसात कापूस पिकावर किडींच्या नियंत्रणासाठी फवारणी करण्यात आली. गणेश यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी कापसावर एकूण सहा फवारण्या केल्या आहेत. तसेच खतांचा वापर अतिशय संतुलित प्रमाणात केला आहे. त्यांनी तीनवेळा डीएपी, १०:२६:२६ सूक्ष्म अन्नद्रव्ये, मॅग्नेशियम सल्फेटचे डोस दिले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गणेश यांना लागवडीपासून ते वेचणी पर्यंत कापसासाठी एकरी 28 हजाराचा खर्च आला आहे. यातून एकरी 16 क्विंटल एवढा कापूस त्यांनी वेचणी केला असून अजून थोडा कापूस वावरात शिल्लक आहे. सध्या कापसाला साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटल ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे.
म्हणजेच त्यांना एकरी एक लाख 44 हजार पर्यंतचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे. एकंदरीत खर्च वजा जाता एक लाख 16 हजार रुपय एकरी नफा त्यांना राहणार आहे. या ठिकाणी एक गोष्ट अतिशय महत्त्वाची ती म्हणजे गणेश यांनी कापसाचे पीक वाचवण्यासाठी स्वतः खूप मेहनत घेतली आहे.
रात्रभर जागल देऊन वन्य प्राण्यांपासून कापूस पीक संरक्षित ठेवले आहे. याकामी त्यांना त्यांच्या सौभाग्यवती भाग्यश्री यांची देखील मोलाची साथ लाभली आहे.