Gold Price Update : ग्राहकांसाठी गुडन्यूज! 10 ग्रॅम खरेदी करा 32097 रुपयांना

Ahmednagarlive24 office
Published:

Gold Price Update : स्वस्तात सोने आणि चांदी खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.कारण मागच्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

या आठवड्यात सोने 501 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 270 रुपयांनी महाग झाली आहे. तरीही ग्राहकांना आता10 ग्रॅम सोने 32097 रुपयांना खरेदी करता येणार आहे. त्याचबरोबर जाणून घेऊयात मागील मागील आठवड्यातील सोने आणि चांदीच्या उलाढाली.

आज जाहीर होणार किंमती 

आजपासून नवीन व्यावसायिक आठवडा सुरू होत आहे. शेवटच्या व्यापारी आठवड्यात सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली होती. त्यामुळे नव्या व्यावसायिक आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीची वाटचाल कशी होते याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्या वगळता IBJA शनिवार आणि रविवारी दर जारी करत नाही. आज सोमवारी सोने आणि चांदीचे नवे दर जाहीर होणार आहेत.

शेवटच्या व्यापारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी (30 डिसेंबर 2022) सोने 54867 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 68092 रुपये प्रति किलोवर बंद झाली. दुसरीकडे, शुक्रवारी (23 डिसेंबर 2022) सोने 54366 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 67822 रुपये प्रति किलोवर बंद झाली. याअगोदर शुक्रवारी (16 डिसेंबर 2022) व्यापारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने 53998 रुपये तर चांदी 646065 वर बंद झाली.

व्यापारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी हा होता दर 

व्यापारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने प्रति १० ग्रॅम २१६ रुपयांच्या वाढीसह 54867 रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाले. तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 80 रुपयांच्या वाढीसह 54651 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर बंद झाले.

शुक्रवारी पुन्हा एकदा सोन्याबरोबरच चांदीच्या दरात वाढ नोंदवली आहे. शुक्रवारी चांदी 252 रुपयांनी महागून 68092 रुपये प्रति किलोवर बंद झाली. तर गुरुवारी चांदीचा दर किलोमागे 8 रुपयांनी घसरून शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी 67840 रुपये प्रति किलोवर बंद झाली आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा दर

शुक्रवारी 24 कॅरेट सोने 216 रुपयांनी महाग होऊन 54867 रुपये, 23 कॅरेट सोने 215 रुपयांनी महाग होऊन 54647 रुपये, 22 कॅरेट सोने 198 रुपयांनी 50258 रुपये, 18 कॅरेट सोने 162 रुपयांनी महाग होऊन 41150 रुपये झाले. 14 कॅरेट सोने 126 रुपयांनी महागले आणि 31924 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले.

सोने 1300 रुपयांनी आणि चांदी 11800 रुपयांनी स्वस्त 

सोने सध्या 1333 रुपयांनी प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. तर दुसरीकडे, चांदी 12888 रुपये प्रति किलो दराने त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा स्वस्त होत आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो इतका आहे.

 करू नका उशीर

सराफा बाजारातील जाणकारांच्या मते, खरमासानंतर 14 जानेवारीला मकर संक्रातीसह लग्नसराईला अजून बराच काळ शिल्लक आहे. सोने आणि चांदीच्या भावातील वाढीचा टप्पा आगामी काळातही कायम राहणार आहे. या लोकांचे असे म्हणणे आहे की नवीन वर्ष 2023 मध्ये सोन्याची किंमत सर्वोच्च पातळीच्या जवळ किंवा त्यापलीकडे जाईल. त्यामुळे तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर लवकरात लवकर खरेदी करा.

अशीही समजू शकते किंमत

तुम्ही आता 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस कॉल देऊ शकता. तुम्हाला थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी http://www.ibja.co किंवा http://ibjarates.com ला भेट देऊ शकता.

अशी जाणून घ्या सोन्याची शुद्धता 

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. आता ग्राहक बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. सोबतच तुम्ही कोणतीही तक्रारही करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe