PM Kisan Yojana : जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात खात्यात जमा होणार पैसे? जाणून घ्या सविस्तर…

Ahmednagarlive24 office
Published:

PM Kisan Yojana : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी चालवली जाणारी एक योजना म्हणजे पीएम किसान योजना होय. लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत.

त्यामुळे शेतकरी आता 13 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या योजनेचा 13 वा हप्ता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

या आठवड्यात जमा होणार पैसे?

या योजनेशी निगडीत प्रत्येक लाभार्थी 13 व्या हप्त्याची वाट पाहत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 13वा हप्ता पहिल्या आठवड्यातच रिलीज होऊ शकतो. परंतु,अधिकृत पोर्टलवर 13व्या हप्त्याची कोणतीही तारीख अपडेट केलेली नाही.

येत्या काही दिवसांत या पोर्टलवर तारीख अपडेट होऊ शकते किंवा सरकारकडून या हप्त्याचे नवीनतम अपडेट दिले जाण्याची शक्यता आहे. हप्त्याची रक्कम सरकारकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे पाठवली जाते.

अनेकांची नावे वगळली जाणार?

12 व्या हप्त्याच्या वेळी अनेक शेतकऱ्यांना लाभार्थी यादीतून हटवले गेले. त्यामुळे यावेळीही या यादीतून अनेकांची नावे काढली जाण्याची शक्यता आहे. यामागचे कारण म्हणजे जमिनीच्या नोंदी आणि ई-केवायसीची पडताळणी नसणे.

या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदी सत्यापित करणे बंधनकारक असल्याचे सरकारने अगोदरच स्पष्ट केले आहे. जर एखाद्या व्यक्तीने असे केले नाही तर तो लाभांपासून वंचित राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe