Cheap 7 Seater Car : भारतीय ऑटो मार्केटमध्ये लोकप्रिय कंपनी मारुती सुझुकीच्या एका 7 सीटर कार ने सध्या बाजारात धुमाकूळ घातला आहे. मागच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये 2022 या 7 सीटर कारची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो ही 7 सीटर कार तुम्ही बजेट सेगमेंटमध्ये खरेदी करू शकतात. चला तर जाणून घ्या या 7 सीटर कारबद्दल संपूर्ण माहिती.
आम्ही येथे मारुतीच्या Maruti Eeco बद्दल बोलत आहोत ज्याची मागच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. अलीकडेच मारुती सुझुकीने Eeco चे अपग्रेडेड मॉडेल सादर केले आहे .नवीन Eeco ची CNG व्हर्जन 26.78 km/kg मायलेज देते, तर Eeco व्हॅनची पेट्रोल-व्हर्जन 19.71km/l मायलेज देते.
डिसेंबर 2022 मध्ये मारुती इकोच्या विक्रीत वाढ झाली आहे. कंपनीने डिसेंबरमध्ये EECO च्या 10,581 युनिट्सची विक्री नोंदवली आहे, तर कंपनीने गेल्या वर्षी याच महिन्यात 9,165 युनिट्सची विक्री केली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कंपनीने 96,135 युनिट्सची विक्री केली आहे, तर आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये कंपनीने 79,406 युनिट्सची विक्री केली आहे.
किंमत
Maruti Eeco13 व्हेरियंटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. यामध्ये 5 सीटर स्टँडर्ड, 5 सीटर एसी, 7 सीटर स्टँडर्ड, 7 सीटर एसी, अॅम्ब्युलन्स आणि अॅम्ब्युलन्स शेल यांचा समावेश आहे. नवीन 2022 मारुती सुझुकी Eeco व्हॅन देखील व्यावसायिक वाहन म्हणून विकली जाते, ज्यात टूरिंग आणि कार्गोचा समावेश आहे.
किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, मारुती सुझुकी इकोच्या 5 सीटर स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत 5.13 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते, तर मारुती सुझुकी इकोच्या सीएनजी व्हेरिएंटची किंमत 6.44 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. सुरू होते.
इंजिन
Maruti Eeco मध्ये 1.2-लीटर, K12C, ड्युअल जेट, ड्युअल VVT, नॅचरली एस्पिरेटेड इंजिन आहे. हे 80bhp कमाल पॉवर आणि 104.4Nm कमाल टॉर्क निर्माण करते. दुसरीकडे, Maruti Suzuki Eeco चे CNG व्हेरियंट अजूनही समान 71bhp कमाल पॉवर आणि 95Nm कमाल टॉर्क निर्माण करते. याव्यतिरिक्त, दोन्ही इंजिन पर्याय 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जुळतात. मारुती सुझुकी इको व्हॅनची सीएनजी व्हर्जन 26.78 किमी/किलो मायलेज देते, तर इको व्हॅनची पेट्रोल-व्हर्जन 19.71 किमी/लि मायलेज देते.
11 सुरक्षा फीचर्ससह सुसज्ज
नवीन Eeco 11 मध्ये अधिक सुरक्षा फीचर्स जोडण्यात आली आहेत, ज्यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, चाइल्ड लॉक, रियर पार्किंग सेन्सर्स, इल्युमिनेटेड हॅझर्ड स्विच इ. हे 5 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही ते मेटॅलिक ब्रिस्क ब्लू, सॉलिड व्हाइट, पर्ल मिडनाईट ब्लॅक, मेटॅलिक सिल्की सिल्व्हर आणि मेटॅलिक ग्लिस्टेनिंग ग्रेमध्ये खरेदी करू शकता.
हे पण वाचा :- Surya Gochar 2023: शनीच्या राशीत येणार सूर्य ! आता 30 दिवस ‘या’ 4 राशींच्या लोकांना भासणार नाही पैशांची कमतरता