Oppo Discount Offers : विश्वास बसेना ! इतकी भन्नाट ऑफर ‘या’ स्मार्टफोनवर तब्बल 30 हजारांचा डिस्काउंट ; फीचर्स लावणार तुम्हाला वेड

Published on -

Oppo Discount Offers : बाजारात बजेट सेगमेंटमध्ये अनेकांना टक्कर देणारी कंपनी  Oppo ने मागच्या महिन्यात Oppo Reno 8 Pro 5G House of the Dragon हा लिमिटेड एडिशन स्मार्टफोन ग्राहकांसाठी सादर केला होता. आता तुम्हाला या स्मार्टफोनवर एक भन्नाट ऑफर प्राप्त झाली आहे. तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊन तब्बल 30,000 रुपयांची बचत करून हा मस्त स्मार्टफोन खरेदी करू शकतात. चला मग जाणून घ्या या मस्त ऑफरचा लाभ कसा घेता येणार आहे.

Oppo Reno 8 Pro 5G House of the Dragon सध्या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर विकले जात आहेत. हे डिवाइस ‘House of Dragon’ वेब सिरीजवर आधारित आहे आणि ड्रॅगन थीम असलेल्या अनेक अॅक्सेसरीजसह येते. मोठ्या सवलतीत हे डिवाइस खरेदी करण्याची संधी फार काळ उपलब्ध होणार नाही.

डिस्काउंट ऑफर

Oppo Reno 8 Pro 5G House of the Dragon ला 52,999 रुपयांच्या मूळ किमतीवर 13% सवलत देऊन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर 45,999 रुपयांना लिस्ट केले गेले आहे. निवडक डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या मदतीने पैसे भरल्यास 4,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलत मिळू शकते.

तसेच, UPI व्यवहारांद्वारे पेमेंट केल्यास 250 रुपयांची सूट दिली जात आहे. एवढेच नाही तर या फोनवर 20,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंटही उपलब्ध आहे. अशा प्रकारे, जर तुम्हाला जुन्या फोनच्या बदल्यात सवलतीचा पूर्ण लाभ मिळत असेल, तर सुमारे 30,000 रुपयांच्या सवलतीनंतर तो 21,999 रुपयांना खरेदी करता येईल.

स्पेशल एडिशन फोनची फीचर्स

फोनची फीचर्स  Oppo Reno 8 Pro 5G सारखीच आहेत आणि 6.7-इंच फुल HD+ AMOLED डिस्प्ले व्यतिरिक्त, Mediatek Dimensity 8100 Max प्रोसेसर 12GB RAM आणि 256GB स्टोरेजसह देण्यात आला आहे. 50MP + 8MP + 2MP ट्रिपल कॅमेरा व्यतिरिक्त, फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. त्याची 4,500mAh बॅटरी जलद चार्जिंग सपोर्टसह लोड करण्यात आली आहे.

फोनसोबत युनिक ऍक्सेसरीज उपलब्ध  

नवीन फोनच्या बॉक्समध्ये स्पेशल फोन केस, स्पेशल सिम इजेक्टर पिन, की-चेन आणि फोन होल्डर उपलब्ध आहेत. स्मार्टफोनसोबतच, कंपनी एक खास कलेक्टेबल ड्रॅगन एग देखील देते. अशा खास अॅक्सेसरीज ‘गेम ऑफ थ्रोन्स’ किंवा ‘हाऊस ऑफ ड्रॅगन’च्या चाहत्यांना आवडतील. त्याच वेळी, या स्पेशल एडिशन फोनची फीचर्स याला सवलतीत एक मजबूत पर्याय बनवतात.

हे पण वाचा :-  LIC Policy : एलआयसीच्या ‘या’ पॉलिसीमध्ये मिळत आहे बंपर नफा ; होत आहे लाखोंचा फायदा , जाणून घ्या कसं

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News