BSNL 5G : अखेर झाले कन्फर्म ! ‘या’ दिवशी वापरकर्त्यांना मिळणार 5G ची सुविधा

Published on -

BSNL 5G : BSNL ही दिग्ग्ज कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. कंपनी सतत कमी बाहेत असणारे प्लॅन सादर करत असते, त्यामुळे तिचा ग्राहकवर्ग जास्त आहे. अशातच आता BSNL च्या ग्राहकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे.

कारण Airtel, Jio आणि Vi शी स्पर्धा करण्यासाठी BSNL ची 5G सेवा ग्राहकांना मिळणार आहे. त्यामुळे 5G सेवा सुरु झाल्यानंतर ही कंपनी पुन्हा इतर कंपन्यांना टक्कर देऊ शकते.

या दिवसापासून मिळणार सुविधा

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बीएसएनएल लॉन्च केल्याची पुष्टी केली आहे. अहवालानुसार, BSNL एप्रिल 2024 पर्यंत त्यांची 5G सुविधा सुरूकरण्याची शक्यता आहे. मात्र कंपनी सध्या, 4G लाँच करण्याच्या तयारीत आहे. या वर्षी 2023 पर्यंत 4G सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

BSNL 5G

BSNL सध्या आपल्या वापरकर्त्यांना 3G सेवा पुरवत आहे. 4G सादर केल्यानंतर एक वर्षाच्या आत, कंपनी आपली नेटवर्क सेवा 5G वर अपग्रेड करणार आहे. सध्या, कंपनी C-DOT आणि TCS च्या सहकार्याने 3G अपग्रेड म्हणजेच 4G लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

अश्विनी वैष्णव यांनी ओडिशामध्ये एअरटेल आणि जिओ 5G सेवा लॉन्च करताना BSNL 5G लॉन्चची घोषणा केली आहे. त्यांनी यावेळी सांगितले की BSNL 5G 2024 च्या मार्च किंवा एप्रिलमध्ये सादर केली जाईल.

संपूर्ण भारतभर मिळणार सुविधा 

गेल्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यांत भारतात 5G सेवा सुरू केली होती. त्याचा भाग बनलेल्या Airtel आणि Jio कंपनीने भारतातील बहुतांश भागात त्यांची 5G सेवा सुरू केली आहे. तर, 2024 पर्यंत संपूर्ण भारतात 5G आणले जाऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News