Business Idea : जगभरात आहे खूप मागणी! सुरु केला ‘हा’ व्यवसाय तर व्हाल लखपती

Ahmednagarlive24 office
Published:

Business Idea : जर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी बातमी कामाची आहे. जगभरात भारतीय कॉफीची चर्चा असून तिला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

जर तुम्ही कॉफीची लागवड केली तर आरामात 50-60 वर्षे भरपूर पैसा कमावू शकता. तुम्ही हा व्यवसाय घरी बसून करू शकता. हा व्यवसाय कसा आणि कधी सुरू करायचा ते जाणून घेऊयात.

भारतातील कॉफीचा दर्जा सर्वोत्तम मानला जात असून गत वर्षी आपल्या देशाने एकूण 4 लाख टनांपेक्षा जास्त कॉफीची निर्यात केली होती. यामध्ये कॉफीची सर्वात जास्त मागणी रशिया आणि तुर्की या दोन देशातून करण्यात आली आहे. त्यामुळे निर्यातीतून $1.11 बिलियनची कमाई नोंदवली आहे.

या आहेत देशातील कॉफीच्या जाती

देशात चहाप्रेमींची संख्या खूप जास्त आहे. तरीही कॉफी पिणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आपल्या देशात कॉफीचे अनेक प्रकार घेतले जातात. केंट कॉफी ही भारतातील सर्वात जुनी कॉफी मानली जात असून तिचे सर्वात जास्त उत्पादन केरळमध्ये आहे.

त्याशिवाय अरेबिका कॉफी ही उत्तम दर्जाची कॉफी मानली जाते. इतरही अनेक जाती भारतात उगवल्या जातात. खुल्या आणि उष्ण ठिकाणी कॉफीची लागवड करणे टाळावे. कारण कॉफीची लागवड फक्त सावली असणाऱ्या ठिकाणी चांगले उत्पादन देते. तसेच कॉफीच्या लागवडीला जास्त सिंचनाची गरज नसते.

लागवड कधी करावी

कॉफीच्या लागवडीसाठी समशीतोष्ण हवामान उत्तम आहे. तापमान 18 ते 20 अंशांपर्यंत सर्वोत्तम मानले जाते. तसेच ते उन्हाळी हंगामात कमाल 30 अंश आणि हिवाळ्यात किमान तापमान 15 अंश सहन करू शकतात. त्यामुळे तीव्र हिवाळ्यात त्याची लागवड करणे टाळावे. चिकणमाती जमिनीत कॉफीचे उत्पादन सर्वात जास्त होते. जून ते जुलै हा महिना पेरणीसाठी उत्तम मानला जातो.

नफा

कॉफीचे पीक एकदा लावले की वर्षानुवर्षे उत्पादन मिळते. पिके सुमारे 50 ते 60 वर्षे कॉफी बियाणे देतात. एक एकर क्षेत्रामध्ये सुमारे 2.5 ते 3 क्विंटल कॉफीच्या बिया तयार होतात. त्यामुळे तुम्ही कॉफीची लागवड करून बक्कळ कमाई करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe