Maharashtra : मोठी बातमी ! राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या घरावर ईडीचा छापा

Published on -

Maharashtra : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्या पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा छापेमारी सत्र सुरूच आहे. राज्यात सध्या शिंदे गट आणि भाजपचे सरकार आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण ईडीकडून हसन मुश्रीफ यांच्या घरावर सकाळी छापा टाकण्यात आला आहे.

हसन मुश्रीफ यांच्यावर साखर कारखान्यातील भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ईडीने त्यांच्या घरावर भल्या सकाळी छापेमारी केली आहे. ईडीकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या घरावर धाड टाकण्याचे सत्र सुरूच आहे.

या सर्व प्रकरणावर हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आज सकाळी ईडीने माझ्या घरावर, माझ्या मुलीच्या घरावर आणि माझ्या नातेवाईकांच्या घरावर छापे टाकले. मी माझ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की शांतता राखावी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे काम करू द्यावे.

पुढे बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, दीड वर्षांपूर्वी छापे पडले होते आणि मी सर्व माहिती एजन्सीला दिली होती, पुन्हा छापे का पडत आहेत हे माहित नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरूच आहे. विरोधी पक्षातील नेत्यांकडून हे सर्व जाणूनबुजून केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe