UIDAI Toll Free Number : देशात भारत सरकारकडून सर्वांसाठी आधारकार्ड सक्तीचे केले आहे. जन्मलेल्या मुलापासून ते वृद्धांपर्यंत आधारकार्ड अनिवार्य आहे. कोणत्याही बँकेत किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी कागदपत्रांमध्ये पहिल्यांदा आधारकार्ड मागितले जाते.
मात्र अनेकांच्या आधारकार्डमध्ये अनेक समस्या आहेत. त्याचा अनेक ठिकाणी आधारकार्डधारकांना त्रास होतो. मात्र आता UIDAI कडून ग्राहकांसाठी एक मस्त सेवा सुरु करण्यात आली आहे.
आधारकार्ड धारकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी UIDAI ने एक टोल फ्री नंबर जारी केला आहे. या नंबरवर कॉल करून तुम्ही सहजपणे तुमच्या समस्यांचे निराकरण करू शकता.
UIDAI कडून आधारकार्ड धारकांसाठी दिवसेंदिवस वेगवेगळ्या सुविधा आणल्या जात आहेत. त्यामुळे त्याचा ग्राहकांना सहज लाभ मिळत आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने इंटरएक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स (IVR) तंत्रज्ञानावर आधारित नवीन ग्राहक सेवा सुरू केली आहे. ही सेवा २४×७ मोफत उपलब्ध असेल.
1947 क्रमांक UIDAI ने ग्राहकांसाठी जारी केला आहे. या नंबरवर कॉल करून ग्राहक सहजपणे समस्या सोडवू शकतात. तसेच हा हेल्पलाईन नंबर सुमारे १२ भाषांमध्ये काम करते.
UIDAI ने ट्विट करत म्हंटले आहे की, तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी या नंबरवर कॉल करू शकता. हा क्रमांक आधार नोंदणी किंवा अद्यतन स्थिती, पीव्हीसी कार्ड स्थिती किंवा एसएमएसद्वारे माहिती मिळविण्यासाठी ट्रॅक करण्यास मदत करेल.
आधारशी संबंधित बहुतेक समस्या 1947 वर कॉल करून सोडवल्या जाऊ शकतात. जर तुम्हाला आधार कार्डशी संबंधित काही समस्या असतील तर तुम्ही 1947 वर कॉल करून ती समस्या सोडवू शकता.
कॉल करताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
जर तुम्हाला आधार कार्डशी संबंधित काही समस्या असतील तर तुम्ही 1947 वर कॉल करून ती समस्या सोडवू शकता.
या हेल्पलाइन नंबरवर तुम्ही हिंदी, इंग्रजी, तेलुगु, पंजाबी, गुजराती, कन्नड, तमिळ, मल्याळम, मराठी, उडिया, बंगाली, उर्दू आणि आसामीमध्ये संवाद साधू शकता.
हा नंबर पूर्णपणे टोल फ्री आहे, म्हणजेच या नंबरवर कॉल करण्यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागणार नाही.
यासोबतच तुम्ही या नंबरवर दिवसाच्या कोणत्याही वेळी IVRS मोडवर कॉल करू शकता.
याशिवाय UIDAI ने असेही म्हटले आहे की जर तुम्हाला आधार कार्डशी संबंधित कोणतीही तक्रार किंवा सूचना द्यायची असेल तर तुम्ही करू शकता.
मेलद्वारे देखील शेअर करू शकता. यासाठी तुम्ही तुमची तक्रार आणि सूचना [email protected] या ई-मेलवर पाठवू शकता.
तुम्हालाही आधार कार्डशी संबंधित काही प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला या नंबरवर कॉल करून तुमची समस्या सोडवायची असेल, तर तुम्ही सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत कधीही वापरू शकता. सोमवार ते शनिवार या क्रमांकाच्या सुविधा तुम्हाला उपलब्ध असतील. रविवारी कोणताही प्रतिनिधी सकाळी 8:00 ते संध्याकाळी 5:00 पर्यंत उपलब्ध असेल.