Modi Government : देशात आज केंद्र आणि राज्य सरकारमार्फत अनेक योजना राबविले जात आहे . ज्याच्या देशातील करोडो नागरिक फायदा देखील घेत आहे. आम्ही देखील तुम्हाला या लेखात आज केंद्र सरकार मार्फत राबविले जाणाऱ्या एका भन्नाट योजनेबद्दल माहिती देणार ज्याच्या फायदा आतापर्यंत अनेकांनी घेतला आहे. या योजने अंतर्गत मोदी सरकार देशातील काही लोकांना दरमहा 3 हजार रुपये पेंशन देते. या योजनेचा तुम्हाला देखील लाभ मिळू शकते चला तर जाणून घ्या कोण या योजनेचा फायदा घेऊ शकतो.
आम्ही तुम्हाला येथे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेबद्दल (पीएम मानधन योजना) माहिती देत आहोत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत लाखो लोकांनी मोठा आर्थिक फायदा प्राप्त केला आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि मोदी सरकार या योजनेच्या मदतीने असंघटित कामगारांना मदत करते.


या योजनेंतर्गत किती लाभ मिळत आहे?
या योजनेअंतर्गत 60 वर्षांवरील असंघटित कामगारांना पेन्शनची सुविधा दिली जाते. या योजनेअंतर्गत या कामगारांना दरमहा सुमारे ₹ 3000 मिळतात. पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या अवलंबितांना पेन्शनच्या 50 टक्के रक्कम दिली जाते. कामगारांची आर्थिक स्थिती सुधारणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी व्यक्तीचे वय 18 ते 40 वर्षे असावे आणि त्यांचा मासिक उत्पन्न 15 हजार रुपये असावे त्यापेक्षा जास्त नसावे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या व्यक्ती आपल्या योजनेत जितकी गुंतवणूक करते तितकीच गुंतवणूक सरकार करते. या योजनेत 55 ते 200 रुपये जमा करता येतात.
याचा लाभ घेण्यासाठी प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि बँक खाते असणे आवश्यक आहे. तुम्हाला देखील या योजनेमध्ये गुंतणवूक करायची असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाणून या योजनेबद्दल अधिक माहिती घेऊ शकतात आणि आपली गुंतणूक सुरु करू शकतात.