Makar Sankranti 2023 : हिंदू धर्मात मकर संक्रांती हा सण हा एक प्रमुख सणांमधील एक सण मानला जातो. या सणाला खूप महत्व दिले जाते. तसेच या दिवशी महिलांना अधिक महत्व असते. या दिवशी तिळगुळ वाटले जातात.
देशातील अनेक राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो. हा सण गुजरातमध्ये उत्तरायण, पूर्व उत्तर प्रदेशात खिचडी आणि दक्षिण भारतात पोंगल म्हणून साजरा केला जातो.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/01/2023.jpg)
या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. त्यामुळे थंडी हळूहळू कमी होईल सुरुवात होते. मकर राशीमध्ये सूर्याचा प्रवेश होतो यामुळे या दिवसाला मकर संक्रांत म्हणतात. यावर्षीही मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.
मात्र अनेकांच्या मनात शंका आहे की नक्की मकर संक्रांत आज की उद्या साजरी करावी? तसेच शुभमुहूर्त कधी आहे हे देखील अनेकांना माहिती नाही. तर चला जाणून घेऊया कधी आहे शुभमुहूर्त…
शुभ मुहूर्त
हिंदू कॅलेंडरनुसार, ग्रहांचा राजा सूर्य 14 जानेवारी 2023 रोजी रात्री 8.21 वाजता मकर राशीत प्रवेश करेल. 15 जानेवारीला उद्या तिथी येत आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्षात 15 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रांती साजरी होणार आहे.
कशी करावी पूजा?
सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून करून चांगले वस्त्र परिधान करावे. तांब्याच्या भांड्यात पाणी भरून काळे तीळ, गुळाचा छोटा तुकडा आणि गंगेचे पाणी घेऊन सूर्यदेवाच्या मंत्रांचा उच्चार करताना अर्घ्य द्यावे. या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य देण्यासोबतच शनिदेवाला जलही अर्पण करावे. यानंतर गरिबांना तीळ आणि खिचडी दान करा.
हे उपाय करा
मकर संक्रांतीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ आणि गंगेचे पाणी मिसळून अंघोळ करावी. यामुळे सूर्याची कृपा होते आणि कुंडलीतील ग्रह दोष दूर होतात. असे केल्याने सूर्य आणि शनि या दोघांचाही आशीर्वाद मिळतो, कारण या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणजे त्याचा मुलगा शनीच्या घरी प्रवेश करतो.
ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे खूप शुभ असते. या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ, गूळ, लाल चंदन, लाल फुले, अक्षत इत्यादी टाकून ‘ओम सूर्याय नमः’ मंत्राचा उच्चार करताना सूर्याला अर्घ्य द्यावे.