Nitin Gadkari Threat Call : मोठी बातमी ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी, सकाळपासून ३ वेळा फोन…

Published on -

Nitin Gadkari Threat Call : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच १ वेळा नाही तर सकाळपासून ३ वेळा धमकीचा फोन आला असल्याची माहिती मिळत आहे.

नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात सकाळपासून ३ वेळा फोन करून धमकी देण्यात आली आहे. जनसंपर्क कार्यालयाच्या लँडलाईन क्रमांकावर तीन वेळा हा फोन आला आहे.

विशेष म्हणजे दाऊदच्या नावाने या धमक्या देण्यात आल्या आहेत. तसेच या फोनद्वारे १०० कोटींची मागणी करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. पैसे दिले नाही तर गडकरींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

नागपूर मधील नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयाची पोलिसांकडून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नितीन गडकरी हे सतत सोशल मीडियावर सक्रिय असतात. गडकरींना मोदींच्या मंत्रिमंडळातील सवोर्त्तम काम करणाऱ्या मंत्र्यांपैकी गणले जाते.

पोलिसांकडून धमकी देणाऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे. धमकीची माहिती मिळताच पोलीस पथकाने तपास सुरु केला आहे. पोलीस कॉल करणाऱ्याचे लोकेशन ट्रेस करत आहेत. जो कोणी दोषी असेल त्याला लवकरात लवकर पकडले जाईल. त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

आज (१४ जानेवारी, शनिवार) सकाळपासून तीन वेळा धमकीचे फोन आले. याची माहिती मिळताच नागपूर पोलीस सतर्क झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयाबाहेर चार फोन नंबर लावण्यात आले आहेत. या क्रमांकांवर सकाळपासून तीन वेळा फोन आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News