SIM Card Gold : तुम्ही अनेकदा बंद पडलेले सिमकार्ड टाकून दिले असेल मात्र तुम्हाला ऐकून धक्का बसेल की त्या सिमकार्डमध्ये सोने असते आणि हे सोने विकून तुम्ही मोठी कमाई देखील करू शकता. सिमकार्ड बनवण्यासाठी सोन्याचा वापर केला जातो.
सिमकार्डमध्ये काही प्रमाणात सोने वापरले जाते. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हो हे खरं आहे. खराब सिमकार्ड जर तुम्ही टाकून दिले असेल तर तुमचा मोठा तोटा झाला आहे.
सिमकार्ड खराब झाल्याने त्यात वापरलेले सोनेही खराब झाले होते. हे सोने पुन्हा वापरण्याऐवजी ई-वेस्ट लँडफिलमध्ये रूपांतरित करण्यात आले. त्यामागचे कारण असे की सिमकार्डमधून सोने वेगळे करण्यासाठी रिसायकलिंग प्रक्रिया नाही.
सिमकार्डमध्ये का वापरले जाते सोने
सिमकार्डमध्ये सोने असते हे खरं आहे मात्र हे सोने काढण्यासाठी अधिक खर्च येत आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण आता हे सोने काढणे शक्य झाले आहे. फोनचे सिमकार्ड रिसायकलिंग करून सोने काढण्याची पद्धत इंपिरियल कॉलेज लंडनने तयार केली आहे.
सिमकार्डमध्ये किती सोने वापरले जाते
तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्यामध्ये किती सोन्याचा वापर केला जातो. एका सिमकार्डमधून किती सोने निघू शकते? तर तुम्ही हजारो सिमकार्ड गोळा करून त्यातील सोने काढले तर फक्त काही ग्राम सोने निघू शकते.
सिमकार्डमधून सोने काढण्याची प्रक्रिया अधिक किचकट आहे. अँजेला सर्पे आणि पाओला डेप्लानो या दोघांनी मिळून सिमकार्डमधून सोने काढण्याचा सोपा मार्ग शोधला आहे. ती इटलीच्या कॅग्लियारी विद्यापीठात काम करते.
फायदा काय होईल?
सिमकार्डमधून काढलेल्या सोन्याचा पुन्हा वापर करता येत नाही. या सोन्यापासून वैद्यकीय उपकरण बनवता येईल. जेणेकरून या उपकरणांची किंमत कमी होईल.