Water Heater : गीझरमध्ये समस्या जाणवतेय? प्लंबरला न बोलवता घरच्या घरीच करा दुरुस्त

Ahmednagarlive24 office
Published:

Water Heater : जवळपास प्रत्येकजण थंडीच्या दिवसात अंघोळीसाठी गरम पाणी वापरतात. पाणी गरम करण्यासाठी अनेकदा हिटिंग रॉड किंवा गीझरचा वापर करतात. परंतु, कालानंतराने अनेकांच्या गीझरमध्ये समस्या जाणवू लागते. 

त्यासाठी लगेच ते प्लंबरला बोलवतात. काही वेळा ही समस्या खूप सामान्य असते जी आपण चुटकीसरशी ठीक केली असती.पाहुयात या समस्या कोणत्या आहेत.

थंड पाणी येते

अनेकदा गीझर चालू असताना पाणी थंड येते. ही खूप सामान्य समस्या आहे. त्या समस्येचे स्वतः निराकरण करू शकता. त्यासाठी तुम्हाला अगोदर तुमचे वॉटर हीटर गॅस आहे की इलेक्ट्रिक हे पाहावे लागणार आहे. जाणून घेण्यासाठी तुम्ही थर्मोस्टॅट तसेच पायलट लाइट देखील तपासू शकता.

स्वतः करा निराकरण 

स्विच केल्यानंतर पाणी खूप गरम येत नाही. जर तुम्हालाही अशी समस्या येत असेल तर त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रीशियनकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही थर्मोस्टॅट तपासून ते 120 अंशांवर सेट करू शकता. तरीही समस्या आली तर तुम्ही प्लंबरला कॉल करू शकता.

दुर्गंधीयुक्त पाणी

जर तुमच्या गिझरमधून दुर्गंधीयुक्त पाणी येत असेल तर यामागचे कारण म्हणजे गीझर जास्त वेळ चालू राहिला किंवा जास्त वेळ पाणी गिझरमध्ये राहिले तर पाण्याला दुर्गंधी येते. दुर्गंधी टाळायची असेल तर गिझरमध्ये गरम पाणी जास्त वेळ ठेवू नका.

गळतीची समस्या

जुने झाल्यानंतर गिझरला गळतीची समस्या जाणवू लागते. व्हॉल्व्ह सैल होतात.जरी ते घट्ट केले आणि तरीही पाणी गळत होत राहिली तर खूप मोठे नुकसान होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe