Bank Stock Price : कमाईची सुवर्णसंधी ! या बँकेचे शेअर्स देणार बंपर कमाई, मिळूवू शकता 26% पर्यंत परतावा…

Ahmednagarlive24 office
Published:

Bank Stock Price : तुम्हीही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. शेअर मार्केटमधील काही शेअर्सवर पैसे गुंतवून तुम्ही हजारो रुपये नफा कमवू शकता. काही बँकेचे शेअर्स तुम्हाला चांगला मोबदला देऊ शकतात.

आज शेअर मार्केटमध्ये HDFC बँकेच्या शेर्समध्ये चांगली तेजी पाहायला मिळाली. तसेच ज्या लोकांनी या बँकेचे शेअर्स खरेदी केले आहेत त्यांना चांगला परतावा मिळत आहे. ट्राडेमध्ये शेअर जवळपास 1.5 टक्क्यांनी वाढून 1621 रुपयांवर पोहोचला.

एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये तेजी

एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये चांगली उसळी पाहायला मिळत आहे. बँकेकडून नफा शेअर करण्यात आला आहे. बँकेचा नफा 19 टक्क्यांनी वाढला असून मालमत्तेचा दर्जाही सुधारला आहे.

ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी 1930 रुपयांच्या लक्ष्यासह HDFC बँकेच्या स्टॉकवर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत HDFC बँकेचा नफा 18.5 टक्क्यांनी वाढून 12,259.5 कोटी रुपये झाला आहे.

नफा मिळणार

एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत असून या बँकेचे शेरास विकत घेतल्यास नफा नक्की मिळणार आहे. ब्रोकरेज हाऊस जेएम फायनान्शिअलचे एचडीएफसी बँकेवर खरेदी रेटिंग आहे ज्याची लक्ष्य किंमत रु. 1,840 आहे. ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने 1,601 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचे सुचवले आहे.

तज्ज्ञांचे मत

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ता सुधारत आहे, पुनर्गठन पुस्तकात सुधारणा झाली आहे. पीसीआर निरोगी आहे आणि बफरची तरतूद मालमत्ता गुणवत्तेला समर्थन देत आहे. FY22-25 या कालावधीत बँकेच्या PAT मध्ये 19 टक्के CAGR वाढ होईल असे तज्ञांचे मत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe