LIC AAO Recruitment 2023 : 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी ! LIC AAO भरती परीक्षेसाठी नोंदणी सुरू, असा करा अर्ज

Ahilyanagarlive24 office
Published:

LIC AAO Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला भारतीय आयुर्विमा महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. LIC AAO भर्ती 2023 साठी 15 जानेवारी 2023 नोंदणी सुरु झाली आहे. या ठिकाणी तुम्ही १२वी पास असाल तर अर्ज करू शकता.

नोंदणी करण्यासाठी एक स्वतंत्र वेबसाइट देण्यात आली आहे. त्या वेबसाइट वरून तुम्ही अर्ज करू शकता. licindia.in यावर तुम्ही नोंदणी करू शकता. 31 जानेवारी 2023 ही नोंदणी करण्याची शेवटची तारीख आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळाने सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदासाठी भरती काढली आहे. एकूण ३०० पदांसाठी भरती होणार आहे. उमेदवाराला ऐकून ३ टप्प्यातून जावे लागेल. पहिला टप्पा म्हणजे प्राथमिक परीक्षा, त्यानंतर मुख्य परीक्षा आणि शेवटी मुलाखत.

पूर्व आणि मुख्य परीक्षेची तारीख

LIC सहाय्यक प्रशासकीय अधिकारी भरतीची प्राथमिक परीक्षा 17 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2023 दरम्यान देशातील विविध शहरांमध्ये होणार आहे. या परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. LIC AAO भरतीसाठी मुख्य परीक्षा 18 मार्च 2023 रोजी होणार आहे. ही तात्पुरती तारीख असली तरी ती बदलू शकते.

शिक्षण पात्रता

LIC मधील संबंधित पदाच्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी असणे अनिवार्य आहे.

अर्ज कसा करावा

सर्व प्रथम LIC वेबसाइट licindia.in वर जा.
होम पेजवर दिसणार्‍या ‘करीअर’ पर्यायावर क्लिक करा.
आता स्क्रीनवर दिसणार्‍या LIC AAO भर्तीच्या अधिसूचना लिंकवर क्लिक करा.
येथे ऑनलाईन अर्ज करा वर क्लिक करा आणि विचारलेले तपशील भरा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe